चौकट-
टमाटा २८ रु. किलो
दोन दिवसांपूर्वी टमाट्याची आवक वाढल्याने भाव कोसळले होते मात्र त्यानंतर भाव सावरले असून सध्या घाऊक बाजारात टमाटा सर्वसाधारणपणे २८ रुपये किलोपर्यंत विकला गेला. कोथिंबीर जुडीलाही चांगला दर मिळत असला तरी पालक मात्र मातीमोल दराने विकली जात असल्याचे दिसते.
चौकट-
डाळी पाच रुपयांनी स्वस्त
किराणा बाजारात जवळपास सर्वच डाळींच्या दरात किलोमागे पाच रुपयांनी घसरण झाली आहे. खाद्य तेलाच्या किमतीही उतरल्या असल्या तरी किराणा बाजारात सध्या मंदीचे सावट आहे. बाजारात फारशी ग्राहकी नाही.
चौकट-
सफरचंद १५० रुपये किलो
फळबाजारात फळांची आवक कमी असून नाशिक बाजार समितीत सर्व फळे मिळून १२०० ते १३०० क्विंटल आवक होत आहे. घाऊक बाजारात सफरचंद ९० पासून १५० रुपये किलोपर्यंत तर केळी ८.५० रुपयांपासून १२.५० रुपये किलोपर्यंत विकले जात आहे.
कोट-
अमेरीकेत बायोडिझेलमध्ये जवळपास ४३ टक्के सोयाबीनचा वापर केला जात होता. तो आता त्यांनी कमी करून १३ टक्क्यांवर आणला आहे. यामुळे सोयाबीन तेल शिल्लक राहू लागल्याने या तेलाचे दर उतरले आहेत. किराणा बाजारात सर्वत्र मंदीचे सावट आहे. - अनिल बूब, किराणा व्यापारी
कोट-
अधूनमधून पडणाऱ्या पावसामुळे भाजीपाला काढण्यास अडचणी येतात. या काळात भाजीपाला टिकविण्यासाठी मोठी कसरत करावी लागते. आवक कमी असल्यामुळे भाजीपाल्याला दर मिळत आहे. कोराेना संकटात शेतकरी आधीच पिचलेला आहे. यामुळे थोडासा दिलासा आहे इतकेच - अविनाश गायधनी, शेतकरी
कोट-
डाळी, खाद्य तेल उतरल्याने आमच्यासारख्या सर्वसामान्यांना दिलासा मिळाला असतानाच पेट्रोलच्या दराने शंभरी पार केली आहे. त्यामुळे महिन्याच्या खर्चात फारसा फरक पडला असे म्हणता येत नाही. इकडे वाचलेले पैसे तिकडे घालवावेच लागतात. - रोहिणी गांगुर्डे, गृहिणी