या बातमीत खालील मुद्दे अपेक्षित आहेत
मिठाईचे दर (प्रतिकिलो)
पेढा - ५२०
गुलाबजाम - ३२०
सुकाजाम- ३६०
बर्फी - ५२०
काजू कथली- १२००
लाडू- २८०
केवळ मोदकाचे दर वाढले
गणेशोत्सवाच्या काळात मोदकांना मागणी असते. यामुळे यात साधारणत: पाच ते दहा रुपयांची वाढ झाली आहे. बाकी इतर मिठाईचे दर स्थिर आहेत. दिवाळीतही फारसे दर वाढण्याची अपेक्षा नाही. कारण, कोरोना संकटामुळे सर्वच अडचणीत आहेत. - दिलीप देवांग, मिठाई विक्रेता
कोट-
आमच्याकडे अद्याप कोणतीही दरवाढ झालेली नाही. ज्यावेळी दरवाढ करायची त्यावेळी किमान चार महिने आधी तसा फलक लावला जाईल. यामुळे ग्राहकांची मानसिकता तयार होईल. सध्या कोरोनामुळे सर्वच अडचणीत आहेत. व्यवसायात नफा-घाटा होत असतो, ते भरूनही निघत असते. यामुळे आताच दर वाढविणे योग्य नाही. - संदीप गवळी, मिठाई विक्रेता
भेसळीकडे लक्ष असू द्या
सणासुदीच्या काळात मिठाईमध्ये भेसळ होण्याचीही शक्यता असते, यासाठी ग्राहकांनी मिठाई खरेदी करताना योग्य ती दक्षता घ्यायला हवी. विक्रेत्याकडे पूर्ण चौकशी करुनच मिठाई खरेदी करायला हवी.
ग्राहक म्हणतात
दुधाचे दर उतरले असल्याने विक्रेत्यांनी मिठाईच्या दरात वाढ करणे योग्य नाही. सणासुदीच्या काळात मिठाईची गरज भासते. कोरोनामुळे आधीच सर्वसामान्य अडचणीत असल्यामुळे विक्रेत्यांनीही दरवाढ करताना विचार करायला हवा. - अविनाश जाधव, ग्राहक
कोट-
मिठाईच्या दरात फारशी वाढ झालेली नसली तरी आहे तेच दर सर्वसामान्यांना परवडणारे नाहीत. विक्रेत्यांनी ग्राहकांना शुद्ध मिठाई द्यायला हवी. ग्राहक विक्रेत्यांवर विश्वास ठेवूूनच खरेदी करत असतात. - दीपक वाहुळे, ग्राहक
चौकट-
दरवाढीबाबत मतप्रवाह
दरवाढीबाबत शहरातील मिठाई विक्रेत्यांमध्ये वेगवेगळे मतप्रवाह असल्याचे त्यांच्याशी बोलताना दिसून आले. दुधाचे दर ६८ वरून ६४ रुपये लीटरपर्यंत आले आहेत. यामुळे मिठाईचे दर वाढण्याचा प्रश्नच येत नाही, असे काही विक्रेत्यांचे मत आहे, तर काहींना आतापासूनच दरवाढ करण्याची घाई झाल्याचे जाणवले. काही विक्रेत्यांनी याबाबत संभ्रमावस्था निर्माण केल्याचे जाणवले.