दापूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत १८ वर्षांवरील नागरिकांच्या कोविड लसीकरणाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून, यावेळी लाभार्थींची कोरोना चाचणी करण्यात आली. आतापर्यंत जवळपास आरोग्य केंद्रांतर्गत गावातील १७०० नागरिकांना कोरोना प्रतिबंधक लस देण्यात आली. तसेच ४५ वर्षांहून अधिक वयाच्या व्यक्ती, त्याचप्रमाणे व्यावसायिक, फ्रंटलाइन वर्कर यांचा नेहमी नागरिकांशी जवळून संपर्क येत असल्याने त्यांना प्राधान्याने लसीकरण करण्यात आले. रुग्णसेवा हीच ईश्वर सेवा समजून दापूर प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. नितीन म्हस्के, डॉ. राहुल हेंबाडे तसेच आरोग्य कर्मचारी, आशासेविका काम करत आहेत. सामाजिक बांधिलकी म्हणून ग्रामपंचायतीचे माजी सदस्य योगेश आव्हाड यांनी पुढाकार घेऊन त्यांचा गौरव केला. यावेळी पोलीसपाटील ज्ञानेश्वर साबळे, सरपंच रमेश आव्हाड, सोमनाथ आव्हाड, योगेश आव्हाड, राजू आव्हाड, समाधान आव्हाड, म्हाळू गामणे, नंदू आव्हाड, अरुण आव्हाड आदी उपस्थित होते.
-----------------
दापूर प्राथमिक आरोग्य केंद्रात वैद्यकीय अधिकारी व आरोग्य कर्मचाऱ्यांचा गौरव करण्यात आला. त्याप्रसंगी नितीन म्हस्के, राहुल हेंबाडे, रमेश आव्हाड, ज्ञानेश्वर साबळे, योगेश आव्हाड, सोमनाथ आव्हाड, नंदू आव्हाड आदी. (२८ दापूर)
===Photopath===
280621\28nsk_11_28062021_13.jpg
===Caption===
२८ दापूर