सिन्नर : तालुक्यातील डुबेरे येथील जनता माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात इयत्ता दहावी व बारावीच्या परीक्षेत पहिल्या पाच क्रमांकाने उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार विद्यालयामार्फत करण्यात आला.शालेय समितीचे अध्यक्ष तथा श्रीमंत थोरले बाजीराव पतसंस्थेचे अध्यक्ष नारायण वाजे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमात व्यासपीठावर उच्च माध्यमिक समितीचे अध्यक्ष विठ्ठल वामने, शिक्षक समितीचे कार्याध्यक्ष अंबादास वाजे, अरूण वारूंगसे, माजी सरपंच शरद माळी, सुभाष वारूंगसे, रामनाथ पावसे, दामोदर कुंदे, भाऊराव वारूंगसे, विजय वाजे, मधुकर वारूंगसे, भरत माळी, सोमनाथ वाजे, सुनिल जाधव, विद्यालयाचे प्राचार्य एस. बी. येवले, पर्यवेक्षक पी. टी. जाधव उपस्थित होते. दहावीच्या परीक्षेतील तेजस माळी, संदेश माळी, श्रद्धा गाढवे, पायल ढोली, वर्षा वारूंगसे तसेच इयत्ता बारावीच्या शुभांगी जगदाने, गया कडभाने, प्रतिक्षा वारूंगसे, ललिता माळी, प्रियंका जगदाने या विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.दहावीच्या परीक्षेत प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झालेल्या तेजस माळी या विद्यार्थ्यांस प्राथमिक शिक्षक समितीचे कार्याध्यक्ष अबांदास वाजे यांनी रोख एक हजार रु पये बक्षीस दिले.
डुबेरे येथील जनता विद्यालयात गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 20, 2019 5:43 PM