नाशिक : सर्वाधिक आदिवासी लोकसंख्या असलेला जिल्हा म्हणून नाशिकची ओळख आहे. जिल्ह्यात सुमारे १५ लाख आदिवासी वास्तव्यास आहेत. त्यांच्या विकासासाठी विविध योजना राबविल्या जात आहेत; मात्र अधिकाधिक प्रामाणिकपणे त्यांचे जीवनमान उंचविण्यासाठी आदिवासी विकास विभाग व जिल्हा प्रशासनासह सर्वच शासकीय स्तरावर प्रयत्न होणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. यांनी केले.राज्य शासनाच्या आदिवासी विकास विभागाच्या वतीने जागतिक आदिवासी दिनानिमित्त राज्यस्तरीय विद्यार्थी गुणगौरव सोहळा, संशोधनपत्रिका व आदिवासी बोली भाषेतील शैक्षणिक क्रमिक पाठ्यपुस्तकांचा प्रकाशन सोहळा गुरुवारी (दि.९) गोविंदनगर परिसरात आयोजित करण्यात आला होता. यावेळी राधाकृष्णन प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. यावेळी व्यासपीठावर महापौर रंजना भानसी, आमदार सीमा हिरे, जिल्हा परिषद अध्यक्ष शीतल सांगळे, आदिवासी विकास आयुक्त किरण कुलकर्णी, प्रकल्प अधिकारी अमन मित्तल, अपर आयुक्त दिलीप गावडे आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी राधाकृष्णन् म्हणाले, आदिवासी बांधवांनी आपल्या शारीरिक-मानसिक क्षमता ओळखण्याची गरज आहे. आदिवासी दुर्गम भागात दर्जेदार आारोग्य, शिक्षणव्यवस्था पुरविण्यासाठी प्रशासकीय स्तरावर सर्व कर्मचारी-अधिकाऱ्यांनी संयुक्त प्रयत्न करावे. आपल्या जिल्ह्यातील आदिवासी भाग याबाबत काही प्रमाणात मागासलेला आहे. ‘मातृत्व’ अॅपमुळे जिल्ह्यातील माता मृत्यूचे प्रमाण कमी होण्यास मदत झाली आहे.दरम्यान, भानसी यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले, आदिवासी विकास विभागाने शासनाच्या सर्व सवलती, योजनांचा प्रचार-प्रसार आदिवासी दुर्गम भागापर्यंत करावा. तसेच मुलांच्या शालेय प्रवेशासाठी असलेली तीन किलोमीटरच अट शिथिल करून ती पाच किलोमीटरची करावी, यासाठी शासनाकडे पाठपुरावा करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
आदिवासी दिनी गुणवंताचा गौरव : आदिवासींचे जीवनमान उंचविण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज -राधाकृष्णन बी.
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 09, 2018 5:08 PM
राज्य शासनाच्या आदिवासी विकास विभागाच्या वतीने जागतिक आदिवासी दिनानिमित्त राज्यस्तरीय विद्यार्थी गुणगौरव सोहळा, संशोधनपत्रिका व आदिवासी बोली भाषेतील शैक्षणिक क्रमिक पाठ्यपुस्तकांचा प्रकाशन सोहळा गुरुवारी (दि.९) गोविंदनगर परिसरात आयोजित करण्यात आला होता.
ठळक मुद्देसर्व कर्मचारी-अधिकाऱ्यांनी संयुक्त प्रयत्न करावे.विशेष प्रावीण्यासह यश संपादन करणा-या एकूण ४१ विद्यार्थ्यांचा गौरवसंशोधन पत्रिकेचे प्रकाशन