घोटी :इगतपुरी तालुक्यातील वैतरणा भागातील नागरिकांच्या आरोग्य सेवेसाठी लाखो रु पये खर्च करून शासनाने प्राथमिक आरोग्य केंद्राच्या सुसज्ज इमारतीचे बांधकाम पूर्ण केले असून आता हे प्राथमिक आरोग्य केंद्र उदघाटनाच्या प्रतीक्षेत राहिल्याने या भागातील रु ग्णाची गैरसोय होत आहे.आरोग्य विभागाने हे प्राथमिक आरोग्य केंद्र तात्काळ चालू करावे अशी मागणी नागरिकांनी केली आहे.गैरसोय लक्षात घेता तत्कालीन जिल्हा परिषद सदस्य गोरख बोडके यांनी या गावाच्या मध्यवर्ती ठिकाण असलेल्या कोरपगाव येथे प्राथमिक आरोग्य केंद्र उभारण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा केला होता.या पाठपुराव्याची शासनाने दखल घेत कोरपगाव गावाच्या नवीन पुनर्वसन ठिकाणी वाकी खापरी धरणाच्या पायथ्याशी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या इमारतीला मंजुरी दिली तसेच निधीही उपलब्ध करून दिला यानुसार हे काम पूर्ण झाले आहे.दरम्यान विज आणि पाण्याची व रस्त्याची सोय असणाऱ्या या नूतन इमारतीला उदघाटनाचा मुहूर्त कधी लागतो याकडे तालुक्याचे लक्ष लागले आहे.(12घोटी कोरपगाव)
कोरपगावचे प्राथमिक आरोग्य केंद्र उदघाटनाच्या प्रतीक्षेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 12, 2018 3:50 PM
घोटी : इगतपुरी तालुक्यातील वैतरणा भागातील नागरिकांच्या आरोग्य सेवेसाठी लाखो रु पये खर्च करून शासनाने प्राथमिक आरोग्य केंद्राच्या सुसज्ज इमारतीचे बांधकाम पूर्ण केले असून आता हे प्राथमिक आरोग्य केंद्र उदघाटनाच्या प्रतीक्षेत राहिल्याने या भागातील रु ग्णाची गैरसोय होत आहे.आरोग्य विभागाने हे प्राथमिक आरोग्य केंद्र तात्काळ चालू करावे अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
ठळक मुद्दे,इगतपुरी तालुक्याच्या वैतरणा परिसरात केवळ धारगाव हे प्राथमिक आरोग्य केंद्र असल्याने कुर्नोली,कोरपगाव,वाळविहीर,शिंदेवाडी,धार्नोली,भावली,रायंबे,क-होळे,भावलवाडी आदी गावातील रु ग्णांना अनेक किलोमीटर अंतराची पायपीट करीत धारगाव येथे किंवा घोटी येथे यावे लागत हो