पेठ : नाशिक जिल्हा प्राथमिक शिक्षक पतसंस्थेच्या पंचवार्षिक निवडणुकीच्या माघारीच्या अखेरच्या दिवशी बहुतांशी उमेदवारांनी माघार घेतल्याने ४४ उमेदवार रिंगणात असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी पी. आर. शिंपी, सहाय्यक विजय आहेर यांनी दिली.प्राथमिक शिक्षक संघ व शिक्षक समिती यांच्यात सरळ सामना होणार असल्याची चिन्हे दिसत आहेत. एकूण पंधरा जागा असलेल्या या पतसंस्थेची निवडणूक २५ तारखेला होणार असून, संपूर्ण जिल्हा कार्यक्षेत्र असलेल्या या संस्थेच्या चाव्या मिळवण्यासाठी दोन्हीही संघटनांकडून प्रयत्न सुरू केले असून, इच्छुक उमेदवारांची मोठ्या प्रमाणात भाऊगर्दी दिसून येत आहे.परिवर्तन विकास पॅनलचा प्रचार शुभारंभ : प्राथमिक शिक्षक संघ व महिला संघटना पुरस्कृत परिवर्तन विकास पॅनलने श्री क्षेत्र सोमेश्वर येथे नारळ वाढवून प्रचाराचा शुभारंभ केला. यावेळी राज्यकार्याध्यक्ष अंबादास वाजे, बाबासाहेब पवार, जिल्हाध्यक्ष राजाराम खैरनार, सुभाष अहिरे, अर्जुन ताकाटे, विनायक ठोंबरे यांच्यासह परिवर्तन विकास पॅनलचे उमेदवार कार्येकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. (वार्ताहर)
प्राथमिक शिक्षक पतसंस्था निवडणूक
By admin | Published: September 16, 2015 10:43 PM