दिंडोरी : येथील तहसील कार्यालयात गोरखपूर येथे झालेल्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा शुभारंभ थेट प्रक्षेपित कार्यक्र म नागरिकांना दाखविण्यात येऊन या योजनेचा दिंडोरी तालुक्यात शुभारंभ करण्यात आला. प्रारंभी प्रांताधिकारी संदीप अहेर, तहसीलदार बाबासाहेब गाढवे यांनी या योजनेतील काही पात्र लाभार्थी शेतकऱ्यांचा प्रातिनिधिक सत्कार करत योजनेची माहिती दिली. शेतकºयांच्या प्रश्नांचे निरसन केले. लहान धारणक्षेत्र असलेली शेती करताना अनेक अडचणींचा सामना करावा लागत असल्याने शेतकºयांना नुकसान भरपाई म्हणून नव्हे तर कायमस्वरूपी मदत देण्यासाठी ही योजना सुरू करण्यात आली आहे, असे अहेर यांनी सांगितले. माहिती संकलित करण्यासाठी तलाठी संवर्गातील कर्मचाºयांनी परिश्रम घेतल्याचे नमूद करून त्यांच्यासह कमी कालावधीत हे काम करणाºया सर्व कर्मचाºयांचे प्रांताधिकारी व तहसीलदार यांनी अभिनंदन केले. दिंडोरी तालुक्यातील सुमारे दहा हजार लाभार्थी शेतकºयांची माहिती संकलित करण्यात आली असून अजूनही पात्र लाभार्थी यांची माहिती संकलित करण्याचे काम सुरु आहे अशी माहिती गाढवे यांनी दिली.यावेळी उपनगराध्यक्ष कैलास मवाळ, नायब तहसीलदार धनंजय लचके, कृषी अधिकारी अभिजित जमधडे, रघुनाथ पाटील, तुषार वाघ आदींसह सर्व मंडळ अधिकारी,तलाठी, लाभार्थी शेतकरी उपस्थित होते.
प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेचा दिंडोरीत शुभारंभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 25, 2019 3:02 PM