सिन्नर : केंद्र शासन पुरस्कृत प्रधानमंत्री पीकविमा योजनेंर्गत सिन्नर तालुक्यात खरीप पिकांचे १.०३ कोटी तर डाळिंबाचे ४.२५ कोटी रूपये मिळणार आहे. यंदा सोयाबीन पिक अधिसुचित झाल्याने तालुक्यातील शेतकऱ्यांना सोयाबीन पिकासाठी देखील प्रथमच विमा काढता येणार आहे.प्रधानमंत्री पीकविमा योजना २०१६ पासून राबविण्यात येत आहे. ही योजना अधिसुचित पिकांसाठी राबविण्यात येत असून, अधिसूचित पीक कर्जदारांना बंधनकारक असून, बिगर कर्जदार शेतकºयांना ही योजना ऐच्छिक आहे. या योजनेतून विमा संरक्षित रक्कम पीककर्ज रकमेईतकी असून, विमा हप्ता हा वास्तवदर्शी दराने आकारला जातो. शेतकºयांवरील हप्त्यांचा भार कमी करून खरीप पिकासाठी (भात, बाजरी, भुईमूग, मूग, उडीद, मका आणि सोयाबीन) २ टक्के, नगदी पिसांसाठी (कापूस, ऊस, कांदा, फळपिके) पाच टक्के असून, उर्वरित हप्ता केंद्र सरकार आणि राज्यशासन यांच्याकडून प्रत्येकी ५० टक्के प्रमाणे कंपनीस दिला जातो. गेल्यावर्षी २०१८ च्या खरीप हंगामात सिन्नर तालुक्यातील सुमारे दीड हजार शेकºयांनी या योजनेत सहभाग घेतला होता. यात मुग पिकासाठी १६० हेक्टर क्षेत्राकरिता, विमा घेतला होता. त्यांना ६.१५ लाख रूपये मिळाले. भुईमूगसाठी ३७८ शेतकºयांनी १३० हेक्टरसाठी पीकविमा घेतला होता. त्यांना २५.३४ लाख रूपये मिळाले.
शेतकऱ्यांना मिळणार पंतप्रधान पिकविम्याचा लाभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 14, 2019 5:46 PM