शहरं
Join us  
Trending Stories
1
Vinod Tawde: विनोद तावडे ठाकुरांच्याच कारमधून एकत्र का गेले? हितेंद्र ठाकुरांनी सगळे सांगितले...
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :"मला गोळ्या झाडा, मी मरणार नाही, तुम्हाला सोडणारही नाही"; हल्ल्यानंतर अनिल देशमुखांची पहिली प्रतिक्रिया
3
भारताचा पाकिस्तानला चॅम्पियन्स ट्रॉफीआधी मोठा धक्का; अंध T20 वर्ल्ड कपकडेही फिरवली पाठ
4
Vinod Tawde: ज्या पैशांवरून राडा केला, ते माझे नाहीतच; ज्या खोलीत पैसे सापडले तिथे मी गेलोच नव्हतो : विनोद तावडे
5
"राहुलजी, याला पोरकटपणा म्हणायचं नाही तर काय..."; विनोद तावडे यांचे राहुल गांधींना चोख प्रत्युत्तर
6
“विनोद तावडेंवर कारवाई करत निष्पक्ष असल्याचे निवडणूक आयोग दाखवणार का?”; काँग्रेसचा सवाल
7
Indian Sports Honours 2024 : मनू, नीरज, स्मृतीसह यशस्वीचा सन्मान; पुरस्कार विजेत्यांची संपूर्ण यादी
8
राज्यातील 'हे' ३१ उमेदवार स्वतःला मत देऊ शकणार नाहीत! नक्की काय आहे प्रकरण?... वाचा
9
Baba Siddique : बाबा सिद्दिकी हत्या प्रकरणात मोठा खुलासा; आरोपीने सांगितलं नाव, कोण होता मास्टरमाइंड?
10
आदित्य ठाकरेंविरोधात भाजपची निवडणूक आयोगाकडे तक्रार; आचारसंहितेचे उल्लंघन केल्याचा आरोप
11
Vinod Tawde: हे गँगवॉर असू शकते...; विनोद तावडे प्रकरणात उद्धव ठाकरेंनी व्यक्त केला संशय
12
“५ कोटी कोणाच्या सेफमधून बाहेर आले?”; विनोद तावडे प्रकरणी राहुल गांधींचा PM मोदींना सवाल
13
विनोद तावडेंवर पैसे वाटपाचा आरोप; बविआचा राडा, निवडणूक आयोगाची पहिली प्रतिक्रिया काय?
14
Amol Kolhe : "पैशाच्या जोरावर महाराष्ट्र जिंकायचा, गुजरातच्या दावणीला बांधायचा"; अमोल कोल्हेंचा भाजपावर हल्लाबोल
15
'पैशासाठी दिल्ली कॅपिटल्सचा संघ सोडलेला नाही...', IPL 2025 लिलावापूर्वी Rishabh Pant च्या पोस्टने खळबळ
16
मतदान एका दिवसावर! महायुती की मविआ?... हे मुद्दे विचारात घेऊन मतदार मत देणार…
17
Vinod Tawde : भाजप नेते विनोद तावडे यांच्यावर निवडणूक आयोगाची कारवाई, पैसे वाटल्याच्या आरोपावरून FIR दाखल
18
मणिपूरमध्ये वाद वाढला, एनडीएचा प्रस्ताव मैतेई संघटनेने फेटाळला; २४ तासांचा अल्टिमेटम दिला
19
“भाजप अन् विनोद तावडेंवर निवडणूक आयोगाने कठोर कारवाई करावी”: बाळासाहेब थोरात
20
Video - डान्स करतानाच नवरदेवाला आला हार्टअटॅक; वराती ऐवजी निघाली अंत्ययात्रा

मनीआॅर्डर पाठविणाऱ्या नैताळेच्या कांदा उत्पादक शेतकºयाची पंतप्रधान कार्यालयाने घेतली दखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 05, 2018 1:31 AM

लासलगाव : कवडीमोल दराने विक्री झालेल्या उन्हाळ कांद्याची रक्कम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मनीआॅर्डरने पाठवून शेतकºयांच्या व्यथांकडे लक्ष वेधणाºया निफाड तालुक्यातील नैताळे येथील शेतकºयाची पंतप्रधान कार्यालयाने दखल घेतली आहे. त्यानुसार, उपजिल्हाधिकारी शशिकांत मंगरुळे यांनी सदर शेतकºयाची विचारपूस करत त्याची स्थिती जाणून घेतली.

ठळक मुद्दे शासनाकडून विचारपूस : १११८ रुपयांची पाठविली होती मनिआॅर्डर

लासलगाव : कवडीमोल दराने विक्री झालेल्या उन्हाळ कांद्याची रक्कम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मनीआॅर्डरने पाठवून शेतकºयांच्या व्यथांकडे लक्ष वेधणाºया निफाड तालुक्यातील नैताळे येथील शेतकºयाची पंतप्रधान कार्यालयाने दखल घेतली आहे. त्यानुसार, उपजिल्हाधिकारी शशिकांत मंगरुळे यांनी सदर शेतकºयाची विचारपूस करत त्याची स्थिती जाणून घेतली.राज्यात यंदा अल्प प्रमाणात पाऊस झाल्याने दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. यामुळे लाल कांद्याचे उत्पादन कमी होईल, असे गृहीत धरत उन्हाळ कांद्याला चांगला भाव मिळेल या अपेक्षेने शेतकºयांनी उन्हाळ कांदा मोठ्या प्रमाणात चाळीत साठवून ठेवला होता. दोन एकर शेती असलेले निफाड तालुक्यातील नैताळे येथील कांदा उत्पादक शेतकरी संजय साठे यांनी १ एकर शेतात द्राक्ष बाग लावली आहे तर उर्वरीत एक एकर क्षेत्रात गेल्या वर्षातील डिसेंबर महिन्यात उन्हाळ कांद्याचे पीक घेतले होते. साठे यांना उन्हाळ कांद्याचे ४५ ते ५० क्विंटल उत्पादन झाले. त्यासाठी त्यांना ५० हजार रु पयांच्या जवळपास खर्च आला. साठे यांनी त्यातील साडेसात क्विंटल कांदा लासलगाव बाजार समितीच्या निफाड उपबाजार आवारात विक्र ी केला असता त्याला १५० रु पये प्रतिक्विंटल भाव मिळाला. यातून उत्पादन खर्च तर दूरच वाहतूक खर्चही वसूल होणार नसल्याने साठे यांनी शेतकºयांच्या या अवस्थेकडे लक्ष वेधण्यासाठी कांदा विक्रीतून मिळालेले १०६४ रुपये आणि त्यात स्वत:चे ५४ रुपये घालून १११८ रुपयांची रक्कम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावे मनीआॅर्डरने पाठवून दिली होती.साठे यांच्या या अनोख्या आंदोलनाची सर्वत्र चर्चा झाली. अखेर त्याची पंतप्रधान कार्यालयाच्या वतीने दखल घेण्यात आली असून नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयास या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.कांदा स्थितीची मागविली माहितीदिल्लीत पंतप्रधान कार्यालयाला मनीआॅर्डरचे पैसे मिळताच त्यांनी त्याची तातडीने दखल घेत राज्य सरकारकडे वस्तुस्थितीची विचारणा करणारे पत्र पाठविले. त्यावरून राज्य सरकारने जिल्हा प्रशासनाला पत्र पाठवून जिल्ह्यात कांद्याचे क्षेत्र, झालेले उत्पादन, कांदा लागवडीसाठी येणारा खर्च, सध्या मिळणारा भाव, भाव कमी मिळण्याची कारणे अशी सर्व माहिती तत्काळ पाठविण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यानुसार जिल्हा प्रशासन मार्केट कमिट्यांकडून माहिती गोळा करीत असून, कांद्याचे दर कोसळण्याची कारणे व शेतकºयांकडे शिल्लक असलेला कांदा शोधण्याचे काम सुरू आहे. पुढच्या आठवड्यात या संदर्भातील माहिती राज्य सरकारमार्फत केंद्र सरकारला सादर करण्यात येणार आहे.उपजिल्हाधिकारी यांच्याकडून चौकशीथेट पंतप्रधानांना मनिआॅर्डर पाठविणाºया संजय साठे या शेतकºयाची उपजिल्हाधिकारी शशिकांत मंगरु ळे यांनी सोमवारी रात्री भेट घेऊन त्यांना कांद्याला मिळालेल्या बाजारभावाची चौकशी केली. याचबरोबर साठे यांना काही राजकीय पाठिंबा आहे काय किंवा त्यांच्याकडून राजकीय भांडवल केले जाते आहे काय, याची खात्री करण्यासाठी नैताळे येथील माजी सरपंच व माध्यमांच्या प्रतिनिधींकडेही साठे यांची चौकशी करण्यात आली.