नाशिक : लोकसभेच्या निवडणुकीसाठी आयोगाने मराठी व हिंदी भाषेत अंतिम मतदार यादी मतदारांसाठी जाहीर केली असली तरी, दक्षिण तसेच महाराष्टÑाला लागून असलेल्या कर्नाटक राज्यात कन्नड भाषेत मतदारांची यादी जाहीर करण्याबरोबरच मुस्लीम मतदारांसाठी विशेषत: मालेगाव व भिवंडी येथील मुस्लीमबहुल मतदान केंद्रांसाठी उर्दू भाषेत यादी प्रसिद्ध करण्याच्या सूचना आयोगाने दिल्या आहेत.देशातील प्रत्येक प्रांताची भाषा वेगळी असली तरी, त्यात बहुतांशी राज्यांमध्ये हिंदीचा प्रभाव अधिक आहे. त्याखालोखाल दक्षिणेत तामिळी, मल्याळम, कन्नडी भाषेचा प्रभाव आहे.एकटा महाराष्टÑ वगळता मराठी भाषेचा वापर अन्य राज्यांमध्ये जवळपास नाहीच, अशावेळी त्या त्या राज्यातील मतदारांच्या मातृभाषेचा विचार करून निवडणूक आयोगाकडून मतदार यादी तयार केली जात असली तरी, महाराष्टÑ व कर्नाटक राज्याच्या सीमेवरील काही गावांमध्ये अजूनही तेथील मराठी मतदार कन्नड भाषेचा वापर करतात, तर राज्यातील जवळपास १५ विधानसभा मतदारसंघ, असे आहेत की त्या ठिकाणी मुस्लीम मतदारांची संख्या अधिक आहे. अशा वेळी त्या मतदारांना त्यांच्या भाषेच्या अडचणीमुळे मतदार यादीत नाव शोधणे कठीण तर होतेच, परंतु त्याचा परिणाम निवडणूक यंत्रणेत काम करणाऱ्या कर्मचारी व अधिकाऱ्यांवरही होत असतो. या सर्व पार्श्वभूमीवर राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी नांदेड, औरंगाबाद, नाशिक, ठाणे, मुंबई शहर, मुंबई उपनगर, सोलापूर, कोल्हापूर व सांगलीच्या निवडणूक अधिकाºयांना खास आदेशाद्वारे १५ विधानसभा मतदारसंघात उर्दू व पाच मतदारसंघात कन्नडी भाषेत मतदार यादीची छपाई करण्याचे आदेश दिले आहेत. साधारणत: कोल्हापूर, सांगली व सोलापूर या मतदारसंघाला लागूनच कन्नड भाषिक अधिक असल्याने त्यांच्यासाठी स्वतंत्र यादी असेल तर अन्य ठिकाणी मुस्लीम मतदारांची संख्या अधिक असल्याने त्यांच्या सोयीसाठी उर्दू भाषेत यादी तयार करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.नाशिक जिल्ह्णातील मालेगाव मध्य व बाह्ण या दोन मतदारसंघात मुस्लीम मतदारांची संख्या सर्वाधिक आहे. मालेगाव मध्यमध्ये तर अपवादात्मक मराठी मतदार असल्यामुळे या मतदारसंघातील जवळपास २८५ मतदान केंद्राची यादी उर्दू भाषेत असेल, तर मालेगाव बाह्ण मतदारसंघातही काही भाग मुस्लीम वस्तीला जोडण्यात आल्याने त्यातील ११८ केंद्रांवर उर्दू भाषेतील मतदार यादीचा वापर केला जाईल.मध्यचा समावेश नाहीनाशिक मध्य मतदारसंघात मोठ्या प्रमाणावर मुस्लीम मतदारांची संख्या असून, हे प्रमाण ६० टक्क्यांच्या आसपास आहे. यातील बहुतांशी मुस्लिमांचे शिक्षण उर्दू माध्यमातून झाले आहे. असे असले तरी, आयोगाने मध्यबाबत अशा सूचना दिलेल्या नाहीत. मनमाड, येवला या विधानसभा मतदारसंघातील काही मतदान केंद्रांच्या अंतर्गत मुस्लीम मतदारांची संख्या अधिक आहे. परंतु त्याबाबतही निर्णय झालेला नाही.
कन्नड, उर्दू भाषेतही होणार मतदारयाद्यांची छपाई
By श्याम बागुल | Published: March 15, 2019 1:50 AM
लोकसभेच्या निवडणुकीसाठी आयोगाने मराठी व हिंदी भाषेत अंतिम मतदार यादी मतदारांसाठी जाहीर केली असली तरी, दक्षिण तसेच महाराष्टÑाला लागून असलेल्या कर्नाटक राज्यात कन्नड भाषेत मतदारांची यादी जाहीर करण्याबरोबरच मुस्लीम मतदारांसाठी विशेषत: मालेगाव व भिवंडी येथील मुस्लीमबहुल मतदान केंद्रांसाठी उर्दू भाषेत यादी प्रसिद्ध करण्याच्या सूचना आयोगाने दिल्या आहेत.
ठळक मुद्देमालेगावचा समावेश : मुस्लीम मतदारांसाठी सोय