सिन्नर : नाशिक ग्रामीण पोलिसांच्या विशेष पथकाने वावीवेस व सातपीर गल्लीत छापा टाकून मटका जुगार खेळणाºया व खेळविणाºया ९ संशयितांना अटक केली आहे. त्यांच्याकडून सुमारे रोख रकमेसह सुमारे ३२ हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे.सिन्नर शहरात चोरुन-लपून मटका-जुगार खेळला जात असल्याची माहिती नाशिक ग्रामीण पोलिसांच्या विशेष पथकाला मिळाली होती. या गुप्त माहितीच्या आधारे पोलीस उपनिरीक्षक भरत चौधरी यांच्यासह हवालदार गोरक्षनाथ संवत्सरकर, संपत अहेर, यांच्या पथकाने वावीवेस भागात छापा टाकला. चार संशयित टाइम नावाचा मटका जुगार खेळतांना आढळून आले. त्यांच्याकडे जुगाराचे साहित्य, रोख रक्कम, व मोबाईल साहित्य असा सुमारे १२ हजार ४९० रुपयांचा मुद्देमाल मिळून आला.त्यानंतर या पथकाने सातपीर गल्लीतील कौलारु घरामध्ये छापा टाकला. याठिकाणी ५ जणांना ताब्यात घेण्यात आले. संशयित टाइम नावाचा मटका खेळत व खेळवित असल्याचे पथकास निदर्शनास आले. पोलिसांनी या पाच जणांकडून अंक आकडे लिहिण्याचे पुस्तक, चिठ्या, कारबन व मोबाईल साहित्य असा २० हजार १३० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
सिन्नर येथे जुगार अड्ड्यांवर छापा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 29, 2017 12:39 AM
सिन्नर : नाशिक ग्रामीण पोलिसांच्या विशेष पथकाने वावीवेस व सातपीर गल्लीत छापा टाकून मटका जुगार खेळणाºया व खेळविणाºया ९ संशयितांना अटक केली आहे. त्यांच्याकडून सुमारे रोख रकमेसह सुमारे ३२ हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे.
ठळक मुद्देवावीवेस व सातपीर गल्लीत छापा मटका जुगार खेळणाºया व खेळविणाºया ९ संशयितांना अटक