दिंडोरी : तालुक्यातील गणेशगाव शिवारात आंबे दिंडोरी रस्त्यावर असलेल्या हॉटेल बैठकवर छापा टाकून पोलिसांनी ४ हजार ६४१ रुपयांचा अवैध मद्य साठा जप्त केला आहे. कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण देशात लॉकडाउन असताना पेठ व दिंडोरी तालुक्यातील व्यावसायिक खुलेआम बेकायदेशीररीत्या मद्य विक्री करत असल्याने पोलिसांनी ही कारवाई सुरू केली आहे.पोलीस उपविभागीय अधिकारी सदाशिव वाघमारे व दिंडोरी पोलीस ठाण्याचे निरीक्षक अनिलकुमार बोरसे यांना मिळालेल्या गोपनीय माहिती नुसार पथकाने ही धडक कारवाई केली.
दिंडोरीत हॉटेलवर छापा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 26, 2020 11:32 PM