नाशिक : कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती शिवाजी चुंभळे यांच्याविरोधात बाजार समितीच्या मुख्यालयात सापळा रचून कारवाई करतानाच दुसरीकडे त्यांच्या सिडकोतील ‘पांडुरंग’ निवास आणि शहरातील दुसऱ्या मालमत्तांवरही लाचलुचपत प्रतिबंधात्मक विभागाने छापे टाकले आहेत. या कारवाईत एसीबीने अंबड पोलीस ठाण्याची मदत घेत दुपारी २ वाजेपासून सुरू केलेली झाडाझडती रात्री उशिरापर्यंत सुरू होती.नाशिक महापालिकेच्या स्थायी समितीची माजी सभापती तथा कृषी बाजार समितीचे सभापती शिवाजी चुंभळे यांच्याविरोधात कृषी उत्पन्न बाजार समितीच्या एका कर्मचाºयाने दिलेल्या तक्रारीवरून कारवाई करीत त्यांना अटक करण्यासोबतच त्याच्या घरासह अन्य मालमत्तांवर छापे मारल्याचे वृत्त आहे.एसीबीने सिडक ोतील चुंभळे यांच्या ‘पांडुरंग’ निवासस्थानी दुपारी २ वाजेपासून घराची झाडाझडती सुरू केली असून, रात्री उशिरापर्यंत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे अधिकाऱ्यांचा तपास सुरू होता.
चुंभळे यांच्या सिडकोतील घरावरही छापा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 17, 2019 1:18 AM