जुने नाशिक : परिसरातील भद्रकाली बाजारात अनधिकृतपणे नायलॉन मांजाची विक्री करणाऱ्या विक्रेत्यावर भद्रकाली पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. आगामी मकर संक्रांतीच्या औचित्यावर होणाऱ्या पंतंगोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शेकडो पक्ष्यांचा नायलॉन मांजामुळे जीव जातो. त्यामुळे नायलॉन मांजावर शहरात बंदी घालण्यात आली आहे. पोलीस प्रशासनाने नायलॉन मांजा विक्री व वापरावर निर्बंध आणले आहे. तरीदेखील भद्रकाली परिसरात कादिर गुलाबखान पठाण (२७, रा. हेलबावडी, दूधबाजार) याने विक्रीसाठी नायलॉन मांजा साठवणूक केल्याचे आढळून आल्याने त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भद्रकाली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विकास शेळके यांनी दुकानावर छापा मारून नायलॉन मांजा जप्त केला. (वार्ताहर)
नायलॉन मांजाविक्रीच्या दुकानावर छापा
By admin | Published: December 29, 2015 12:21 AM