सिन्नर येथे नगरपरिषदेचा अतिक्रमणविरोधी पथक व पोलिसांनी संयुक्त कारवाई करीत नायलॉन मांजाचे रिळ जप्त करण्याची कारवाई केली.
सिन्नर : येथील नगरपरिषदेच्या अतिक्रमण विरोधी पथकाने पोलिसांच्या मदतीने संयुक्त कारवाई करीत नायलॉन मांजाची विक्री करणाºयावर छापा टाकला. या कारवाईत नायलॉन मांजाचे ३३ रिळ जप्त करण्यात आले.येथील सांगळे कॉम्प्लेक्समध्ये नायलॉन मांजाची विक्री होत असल्याची माहिती नगरपरिषदेच्या अतिक्रमण विरोधी पथकाला मिळाली होती. पर्यावरणाला घातक असणाºया नायलॉन मांजा विक्रीवर बंदी असतांना विक्री होत असल्याचा प्रकार गंभीर होता. नायलॉन मांजाची विक्री करुन नये व केल्यास फौजदारी कारवाई करण्याचा इशारा नगरपरिषदेच्या प्रशासनाने यापूर्वीच दिला होता. असे असतांनाही सांगळे कॉम्प्लेक्समध्ये विक्री होत असल्याची माहिती पथकाला मिळाली. या दुकानदाराकडे डमी ग्राहक पाठवून नायलॉन मांजाची विक्री होत असल्याची खात्री करण्यात आली. त्यानंतर पोलीस व नगरपरिषदेच्या अतिक्रमण विभागाने संयुक्त छापा मारला. त्यात नायलॉन मांजाचे ३३ रिळ ताब्यात घेण्यात आले.अतिक्रमण विरोधी विभागाचे प्रमुख नीलेश बाविस्कर, पोलीस हवालदार भगवान शिंदे, योगेश माळवे यांच्यासह पथकात अतिक्र मण पथकाच्या चार कर्मचाºयांचा समावेश आहे. दुकानाची झडती घेतली असता एका खोक्यात ठेवलेले ३३ रिळ आढळून आले. नायलॉन मांजा विरोधात शहरात यापुढेही कारवाई सुरु ठेवण्याचा इशारा नगरपालिका प्रशासनाने दिला आहे. नायलॉन मांजा पर्यावरणासाठी घातक असून त्याच्या विक्रीस मनाई आहे. अशा प्रकारची विक्री करणाºयांवर सक्त कारवाई करण्याच्या सूचना नगराध्यक्ष किरण डगळे, उपनगराध्यक्ष प्रमोद चोथवे, मुख्याधिकारी व्यंकटेश दुर्वास यांनी अतिक्र मण विभागाला दिल्या आहेत. नायलॉज मांज्याच्या विक्रीबाबत माहिती असल्यास अतिक्रमण विभागाला माहिती देण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे. माहिती देणाराचे नाव गोपनीय ठेवण्यात येईल असे अतिक्रमण विरोधी विभाग प्रमुख नीलेश बाविस्कर यांनी सांगितले.