नोटबंदीपूर्वी भाजपने पैसा परदेशात पाठवला- पृथ्वीराज चव्हाण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 12, 2018 08:58 PM2018-08-12T20:58:24+5:302018-08-12T21:00:17+5:30
भाजपने नोटबंदी करण्यापूर्वीच आपला पैसा परदेशात पाठवून तसेच विविध ठिकाणी गुंतवून नोंटबंदीनंतर पुन्हा तो पक्षाक डे वळवला, तर विरोधी पक्षांचे मात्र या माध्यमातून खच्चीकरण केल्याचा आरोप पृथ्वीराज यांनी चव्हाण रविवारी (दि.१२) नाशिकमध्ये केला. तसेच भाजापा सरकार सत्तेत येण्यापूर्वी ५० लाख रुपयांपर्यंत उलाढाल असलेली अमिशा यांच्या मुलाची कंपनी ८० कोटींपर्यंत कशी पोहचली असा सवालही त्यांनी यावेळी उपस्थित केला
नाशिक : भाजपने नोटबंदी करण्यापूर्वीच आपला पैसा परदेशात पाठवून तसेच विविध ठिकाणी गुंतवून नोंटबंदीनंतर पुन्हा तो पक्षाक डे वळवला, तर विरोधी पक्षांचे मात्र या माध्यमातून खच्चीकरण केल्याचा आरोप पृथ्वीराज यांनी चव्हाण रविवारी (दि.१२) नाशिकमध्ये केला. तसेच भाजापा सरकार सत्तेत येण्यापूर्वी ५० लाख रुपयांपर्यंत उलाढाल असलेली अमिशा यांच्या मुलाची कंपनी ८० कोटींपर्यंत कशी पोहचली असा सवालही त्यांनी यावेळी उपस्थित केला. तसेच राज्य सरकारने समृद्धी महामार्ग आणि बुलेट ट्रेन प्रकल्पाच्या परिसरातील जमिनी भांडवलदारांच्या घशात घालण्याचा घाट घातला असून, या प्रकल्पांना मंजुरी मिळण्यापूर्वीच मुख्यमंत्री कार्यालयातील अधिकाऱ्यांनी समृद्धी महामार्ग आणि बुलेट ट्रेन मार्गाच्या परिसरात जमिनी घेतल्या असल्याचा आरोप त्यांनी केला. त्याचप्रमाणे प्रकाश मेहता यांच्यासह अमित शाह यांचे पुत्र जय शाह यांच्या विरोधात चौकशी करण्याची मागणी होत असताना सरकार कोणतीही कारवाई करीत नसल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान, वर्षभरात सार्वत्रिक निवडणुका होणार आहे. त्यामुळे लोकसभा व विधानसभा निवडणुका एकत्रित होणार की उशिरा होणार याविषयी सध्या राज्यात संभ्रमावस्था आहे. केंद्र सरकारचा कार्यकाळ संपला असून, त्यांना जनतेला दिलेली आश्वासने पूर्ण करण्यात अपयश आले आहे. अशा परिस्थितीत काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी यांनी संसदेत केंद्र सरकार विरोधातील अविश्वास ठरावात सरकारला उघडे पाडत येणाºया लोकसभा निवडणुकांचा शंखनाद केल्याचे चव्हाण म्हणाले. नरेंद्र मोदींचे सरकार हटविण्यासाठी देशातील लोकशाहीत विश्वास असणारे सर्व पक्ष एकत्रित येत असल्याचे सांगतानाच त्यांनी कार्यकर्त्यांना लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांच्या कामाला लागण्याच्या सूचना केल्या.