शहरं
Join us  
Trending Stories
1
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
2
Maharashtra Election 2024: "सगळीकडं जायचं, फक्त भुंकायचं"; आनंदराव अडसूळांचं नवनीत राणांवर टीकास्त्र
3
प्रियंका गांधींची आज कोल्हापुरात 'महाराष्ट्र स्वाभिमान' सभा, सभेची जय्यत तयारी
4
Mutual Funds नं 'या' १५ स्टॉक्समध्ये केली सर्वाधिक खरेदी, तुमच्याकडे आहेत का?
5
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
6
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
7
रिझर्व्ह बँक व्याजदरात कपात करणार की नाही? Moodys नं सांगितला काय आहे देशाचा 'मूड'
8
अश्नीर गोव्हरची Bigg Boss 18 मध्ये एन्ट्री; सलमान खानने 'दोगलापना'वर केली टीका म्हणाला- "तुम्ही जे चुकीचं..."
9
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
10
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
11
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
12
आजचा अग्रलेख: प्रचारातील काय चालेल हो?
13
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
14
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
15
ढगाळ हवामानामुळे मुंबईत थंडी पळाली; बदलत्या हवामानाचा परिणाम
16
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
17
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
18
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
19
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
20
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला

होमगार्डच्या भरतीत जिल्ह्याच्या उमेदवारांना प्राधान्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 06, 2019 7:02 PM

या भरतीत गैरशिस्त, अफरातफर, गुन्हेगारी स्वरूपाचे आरोप असणाऱ्यांना प्रवेश नसेल. या भरतीत नाशिक जिल्ह्यातील रहिवाशी असलेल्या उमेदवारांनाच प्राधान्य देण्यात येणार असल्याची माहिती अपर पोलीस अधिक्षक शर्मिष्ठा वालावलकर यांनी दिली आहे.

ठळक मुद्देगुन्हेगारांना नो एंट्री : शारिरीक पात्रतेवरच होणार भरती

लोकमत न्युज नेटवर्कनाशिक : जिल्ह्यात गृहरक्षक दल अर्थात होमगार्डची मेगा भरती करण्यात येणार असून, पोलिस भरतीच्या धर्तीवरच २९ मार्च रोजी पोलीस मुख्यालयातील कवायत मैदान व ग्रामीण पोलीस आडगांव येथे या भरतीची प्रक्रिीया सुरू करण्यात येणार आहे. या भरतीत गैरशिस्त, अफरातफर, गुन्हेगारी स्वरूपाचे आरोप असणाऱ्यांना प्रवेश नसेल. या भरतीत नाशिक जिल्ह्यातील रहिवाशी असलेल्या उमेदवारांनाच प्राधान्य देण्यात येणार असल्याची माहिती अपर पोलीस अधिक्षक शर्मिष्ठा वालावलकर यांनी दिली आहे.

होमगार्ड सदस्य नोंदणी प्रक्रिया २९ मार्च रोजी सकाळी ६ वाजता सुरू होणार असून, पुरुष उमेदवारांसाठी पात्रता निकष वय २० ते ५० वर्ष इतके असेल व दहावी उत्तीर्ण असावे लागेल. उंची १६२ से.मी. तसेच छाती न फुगवता ७६ सें.मी व फुगवुन ८१ से.मी. असणे आवश्यक आहे. महिला उमेदवारांसाठी पुरूषांसारखेच निकष असतील परंतु उंची १५० से.मी. असणे आवश्यक आहे. या अटी व शर्ती पुर्ण करीत असलेल्या इच्छुक उमेदवारांनी मुळ कागदपत्रांसह व छायांकित प्रतीसह स्वखचार्ने उपस्थित राहावे असे आवाहन करण्यात आले आहे. या भरतीसाठी नोंदणी प्रक्रियेत सहभागी होण्यासाठी उमेदवाराचे पोलीस चारित्र्य पडताळणी अहवाल अनुकूल असावा. शारिरीक विकलांगता असलेले उमेदवार तसेच यापुर्वी संघटनेत असलेले परंतु गैरशिस्त, अफरातफर, न्यायालयीन प्रकरणी दोषी असलेले होमगार्डस नोंदणीसाठी अपात्र ठरविण्यात येतील. भरतीसाठी उमेदवार नाशिक जिल्ह्यातील रहिवासी असणे आवश्यक असून रहिवासी पुराव्याकरिता आधार कार्ड, मतदान कार्ड व शिधापत्रिका व शैक्षणिक अर्हता प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे. जन्मतारखेच्या पुराव्यासाठी शाळा सोडल्याचा मुळ दाखला सोबत आणणे अनिवार्य असून, एक फोटो आयडी पुरावा व उमेदवाराचे नजीकच्या काळातील चार पासपोर्ट साईज फोटो जोडावेत. महिला उमेदवारांनी वडीलांचे, पतीचे, कुंटुंब प्रमुखांचे नाहरकत प्रमाणपत्र जोडावे. तसेच एनसीसी, माजी सैनिक, खेळाडू , आयटीआय, जडवाहन चालक, नागरी संरक्षण सेवेत तीन प्रशिक्षण पुर्ण केलेले उमेदवारांनी त्यासंदभार्तील मुळ प्रमाणपत्र सोबत आणणे आवश्यक आहे. सदस्य नोंदणी करिता आलेल्या उमेदवारांना २९ मार्च रोजी सकाळी ८ वाजेनंतर सदस्य नोंदणी प्रक्रियेत प्रवेश देता येणार नसल्याचे अपर पोलीस अधिक्षक तथा जिल्हा समादेशक होमगार्ड वालावलकर यांनी कळविले आहे.

 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीNashikनाशिक