ठळक मुद्दे उपचार सुरू असताना दुपारी मृत्यू झाला़
नाशिक : नाशिकरोड मध्यवर्ती कारागृहातील नरेंद्र धडक ईसी (४५, कैदी नंबर सी- ८८९२) या कैद्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची घटना सोमवारी (दि़२५) सकाळी घडली़ नरेंद्र ईसी याच्या पायास जखम होऊन इन्फेक्शन झाल्याने त्यास कारागृहाचे कर्मचारी दादासाहेब नवगिरे यांनी सोमवारी सकाळी ९ वाजेच्या सुमारास जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते़ त्याच्यावर उपचार सुरू असताना दुपारी १२ वाजेच्या सुमारास त्यांचा मृत्यू झाला़या प्रकरणी सरकारवाडा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे़