लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : जिल्हा रुग्णालयात दाखल होण्यासाठी आजारपणाचे नानाविध हातखंडे आजमाविणाऱ्या कैद्यांना आता चाप बसणार आहे. कारागृहातच रुग्णांवर ‘टेलि मेडिसिन’द्वारे उपचार होणार असून, अत्यंत गरज असेल तरच कैद्यांना रुग्णालयात दाखल होण्याचा सल्ला दिला जाणार आहे. विशेष म्हणजे याप्रक्रियेमुळे कैद्यांना रुग्णालयात घेऊन जाण्याचा धोकाही टळणार आहे. कारागृहात शिक्षा भोगत असलेल्या कैद्यांवर उपचार करण्यासाठी कारागृहात वैद्यकीय अधिकारी आणि रुग्णालयदेखील आहे. परंतु कित्येकदा कैदी जिल्हा रुग्णालयात जाण्याचा आग्रह धरतात. यामागे आजारपण हे कारण नसून उपचारानिमित्ताने त्यांना बाहेर पडता येतं आणि रुग्णालयात नातेवाइकांशी वरवर भेट होते. चोरीछुपे, तर कधी उघडपणे खाद्यपदार्थांसह काही चिजवस्तूही त्यांना मिळतात. याच कारणामुळे कैद्यांकडून आजाराचे निमित्त केले जाते. कारागृहात समाधानकारक उपचार होत नसल्याचे आणि उपचार लागू पडत नसल्याचे कारण सांगत कैदी जिल्हा रुग्णालात तपासणी करण्याची मागणी नोंदवितात. काही कैदी पोटदुखी, त्वचाविकार आणि दात दुखीची कारणे सांगतात. कारण कारागृहात अशा उपचाराचे तज्ज्ञ आणि यंत्रसामुग्रीही नसते. त्यामुळे त्यांना पुढील उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात न्यावेच लागते. आजारपणाचे असे आहेत बहाणेकैदी कारागृहातील रुग्णालयात असलेल्या उपचारांवर नाराजी व्यक्त करीत जिल्हा रुग्णालयात नेण्याचा आग्रह धरतात, तर दात, पोट, डोळे तसेच त्वचा आजाराचे कारणही पुढे करतात. या आजाराची यंत्रसामुग्री कारागृहात नसल्याचे कैद्यांना ज्ञात असल्याने कैदी याच आजारांचा बहाणा करतात. जिल्हा रुग्णलायात गेल्यानंतर त्यांची नातेवाइकांशी भेट होते. नातेवाइकांकडून खाद्यपदार्थही मिळतात. त्यामुळे कैदी रुग्णालयात आराम फर्माविण्यासाठी जात असल्याचा आजवरचा अनुभव कारागृह प्रशासनाला आहे.
कैद्यांचा रुग्णालयातील ऐशोआराम होणार बंद
By admin | Published: June 19, 2017 1:29 AM