अमेरिका येथे एॅरिझोना येथे १७ एप्रिल ते २४ एप्रिल दरम्यान बाहा एस ए इंटरनॅशनल ही अंडरग्रॅज्युएट इंटर कॉलेजियन डिझाईन स्पर्धा होणार असून त्यासाठी पृथ्वीराजची निवड झाली आहे. यापूर्वी महिंद्रा पुरस्कृत सोसायटी आॅफ आॅटोमॅटिक इंजिनीअरच्या वतीने मध्यप्रदेश पीतमपुर येथे आयोजित केलेल्या बाहा राष्ट्रीय स्पर्धेत डी. वाय. पाटील कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी बनविलेल्या रेसर कारला प्रथम विजेता पदासह अन्य पाच प्रकारात प्रथम क्रमांक मिळाला होता. या यशानंतर आता त्यांची अमेरिकेतील एरिझोना येथे होणाºया स्पर्धेसाठी निवड करण्यात आली आहे. शिंदे यांच्यासह त्यांची टीम प्रिडेटर रेसिंग डी. वाय. पी. कॉलेज आॅफ इंजीनिअरिंग आकुर्डी पुणे यांची निवड करण्यात आली आहे. या टीममध्ये साकेत राऊत, प्रणव काटेकर, गौरव मोरे, तेजस धकाते, विशाखा कोटकर, अपूर्व महिन, अंशुला गुप्ता, ऋग्वेद गोवारीकर, आली अबू फर्जद यांची निवड करण्यात आली आहे. त्यांना प्राचार्य विजय एम वडाई, प्रा. सुनील पाटील यांचे मार्गदर्शन लाभले.
मनेगावच्या पृथ्वीराजची आतंरराष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 08, 2020 6:14 PM