नाशिक : जिल्हा प्रायव्हेट कोचिंग क्लासेस संचालक संघटनेच्या जिल्हाध्यक्षपदी प्रा. जयंत मुळे यांची सलग तिसऱ्यांदा निवड झाली आहे. तब्बल नऊ वर्षांनी लोकशाही पद्धतीने झालेल्या या निवडणुक प्रक्रियेत जयंत मुळे यांनी त्यांचे विरोधक सुभाष जाधव यांचा २७ मतांनी पराभव करीत विजय मिळवला. त्यानंतर मुळे यांनी शहर संघटनेची कार्यकारी जाहीर केली असून, लवकरच जिल्हा कार्यकारिणीतील तालुकास्तरीय सदस्यांचीही घोषणा करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.नाशिकमधील एका क्लासच्या इमारतीत रविवारी (दि. २०) जिल्हा प्रायव्हेट कोचिंग क्लासेस संचालक संघटनेच्या वार्षिक सभेत जिल्हाध्यक्ष पदासाठी त्रैवार्षिक निवडणूक घेण्यात आली. या निवडणुकीत गत दोन त्रैवार्षिक मध्ये बिनविरोध निवड झालेले प्रा. जयंत मुळे यांनीच विजय मिळवून सलग तिसºयांना अध्यक्षपद काबीज केले. निवडणूक प्रक्रियेनंतर नवनिर्वाचित अध्यक्षांनी तत्काळ कार्यकारिणी जाहीर केली. यात राज्य प्रतिनिधी म्हणून यशवंत बोरसे व फैजल पटेल, उपाध्यक्षपदी अरुण कुशारे, मुकुंद रनाळकर, अण्णासाहेब नरु टे, शशिकांत तिडके, सचिवपदी लोकेश पारख, खजिनदार अतुल आचळे यांचा समावेश असून, कार्याध्यक्ष विजय डोशी यांच्यासह वाल्मीक सानप, पूनम कांडेकर, संजय कुलकर्णी, सहखजिनदार, संजय अभंग, सहकार्याध्यक्ष किशोर सपकाळे, नीलेश दुसे, सुभाष जाधव, धनंजय धाकणे आदींचाही या समितीत समावेश आहे, तर सिन्नर तालुक्यातून जयदेव जव्हेरी, निफाडमधून सागर सानप, व कळवणमधून गिरीश येवला यांचा कार्यकारिणीत समावेश करण्यात आला आहे.शिकवणी कायद्याची अंमलबजावणी करण्याची मागणीजिल्हा प्रायव्हेट कोचिंग क्लासेस संचालक संघटनेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत राज्य शासनाने शिकवणी नियमन कायद्याची अंमलबजावणी करण्याचा ठराव करण्यात आला. तसेत इंटिग्रेटेड क्लासेस, बायोमेट्रिक हजेरी, शाळा महाविद्यालयांसारख्या शिक्षण संस्थांमध्ये नोकरीस असताना खासगी क्लासेस चालविणाºया शिक्षकांवर सरकारने कारवाई करावी, त्यासाठी जिल्हाधिकाºयांच्या नियंत्रणात स्वतंत्र समिती स्थापण करावी, अशी मागणीही यावेळी करण्यात आली.
खासगी क्लासेस संघटनेची कार्यकारिणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 21, 2019 12:43 AM