दरम्यान, अनेक शिक्षकांना कोरोना संसर्ग अगोदरच होऊन गेला आहे. तसेच हे काम रूग्णालयात जाऊन करायचे असल्याने काही संघटनांचा विरोध आहे. तर दुसरीकडे काही शिक्षक राजकीय दबावातून नव्या जबाबदारीतून वगळण्यासाठी आटापीटा करीत आहे. शहरात सुमारे १३२ कोविड रूग्णालये आहेत. याठिकाणी ८०: २० यानुसार बेडसचे आरक्षण आहे. परंतु त्यासाठी महापालिकेच्या पेार्टलवर ताजी माहिती अपडेट करण्याचे बंधन असताना तसे होत नसल्याचे प्रशासनाच्या पाहणीत आढळले होते. त्यामुळे एकीकडे रूग्णालयात बेड शिल्लक असतानाही बेड शिल्लक नसल्याचे दिसते त्यामुळे हा गोंधळ निवारण्यासाठी महापालिकेने खासगी प्राथमिक शाळांमधील सुमारे सातशे शिक्षकांवर जबाबदारी दिली आहे. त्यांना यासंदर्भात पत्र देऊन बुधवारी (दि.१४) सर्व शिक्षकांना मुख्यालयात एकाच वेळी प्रशिक्षणासाठी बोलवले हेाते. महापालिकेचे नियोजन चुकल्याने मुख्यालयात गर्दी झाली आणि फिजीकल डिस्टन्सींगचा फज्जा उडाला.
दरम्यान, महापालिकेने प्रशिक्षणाची जबाबदारी टाकल्याने शिक्षक वर्गात नाराजी आहे. मुळातच अनेक शिक्षक ज्येेष्ठ आहेत. त्यात महिलांची संख्या मोठी आहे. अनेक शिक्षकांना काेरोना होऊन गेला आहे, अशावेळी रूग्णालयात जाऊन काम करण्यास शिक्षक उत्सूक नाही. त्यामुळे अनेक संघटनांची नाराजी असल्याचे समजते.
इन्फो..
आज बैठक होणार
शिक्षकांचे आधी लसीकरण करावे तसेच रात्रपाळीच्या कामातून शिक्षीकांना मुक्त करावे तसेच शिक्षकांच्या आरोग्य सुरक्षतीतेची हमी द्यावी अशी शिक्षक संघटनांची मागणी असून त्यासंदर्भात गुरूवारी (दि.१५) महापौर सतीश कुलकर्णी आणि स्थायी समिती सभापती गणेश गिते यांच्या समवेत बैठक होणार आहे.