नाशिक : शहातील काही खासगी रुग्णालयांमध्ये कोरोनाविषयी बेजबाबदारपणे काम सुरू असून कॅनडा कॉर्नर परिसरातील एका रुग्णलायाविरोधात अशाचप्रकारे कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजना न करता रुग्णांच्या आरोग्यविषयी निष्काळजीपणा दाखविण्यात येत असल्याचा आरोप छावा जनक्रांती संघटनेच्या महासचीव अलका शेळके- मोरे यांनी सोमवारी (दि. २९)पत्रकार परिषदेत केला. रुग्णालयात कोरोना रुग्णाचा खुलेआम वावर असून त्यांचा अन्य रु ग्ण व त्यांच्या नातेवाईकांशीही संबध येत असल्याने कोरोनाचा फैलाव वाढण्याची भिती यावेळी संघटनेतर्फे व्यक्त करण्यात आली. तसेच प्रा. राज पवार यांनी त्यांच्या वडिलांना हृदयविकाराचा त्रास होत असतानाही अशा समास्यांचा सामना करावा लागल्याचे सांगितले. यासंदर्भात विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, मनपा आयुक्त व मुख्यमंत्री कार्यालयासही निवेदन दिले असून संबधित रुग्णालयावर कारवाई झाली नाही तर २ जुलैैैै रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात आंदोलन करण्याचा इशाराही यावेळी छावा जनक्रांती संघटनेतर्फे करण्यात आला आहे. त्याचप्रमाणे अशा निष्काळजीपणास जबाबदार जिल्ह्यातील व शहरातील उच्चपदस्थ प्रशासकीय अधिकाºयांवरही कारवाई करण्याची मागणी यावेळी अॅड. अलका शेळके-मोरे यांच्यासह सुषमा बोरसे, निलोफर शेख, गोपाळ सोनवणे, वैभव गवाल, युवराज राजपूत जैनब शेख आदींनी केली आहे.
नाशकात कोरोनाविषयी खासगी रुग्णालयाचा निष्काळजीपणा ; छावा जनक्रांतीचा संघटनेचा आरोप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 29, 2020 6:11 PM
नाशिक शहातील एका खासगी रुग्णलायाविरोधात कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजना न करता रुग्णांच्या आरोग्यविषयी निष्काळजीपणा दाखविण्याचा आरोप छावा जनक्रांती संघटनेच्या महासचीव अलका शेळके- मोरे यांनी केला आहे.
ठळक मुद्देकोरोनाविषयी खासगी रुग्णालयात निष्काळजीपणाछावा जनक्रांतीचा रुग्णालयावर बेजाजबदारपणाचा आरोप