उमराणे : गेल्या दोन महिन्यांपूर्वी महात्मा फुलेनगर ( ता.देवळा) येथील खाजगी रामेश्वर कृषी बाजाराला पणन मंडळाकडून परवाना देण्यात आला होता. मात्र येथील स्व.निवृत्ती काका देवरे कृषी उत्पन्न बाजार समितीने या खाजगी बाजाराबाबत आक्षेप घेतल्याने शासन निर्देशास अनुसरून पणन संचालक सतीश सोनी यांनी खाजगी रामेश्वर कृषी बाजाराचा परवाना तात्पुरता स्थगित केला आहे.महात्मा फुलेनगर ( ता.देवळा ) येथे खाजगी रामेश्वर कृषी बाजार निर्मितीसाठी पणन मंडळाकडे अर्ज करण्यात आला होता. त्या अनुषंगाने महाराष्ट्र कृषी उत्पन्न पणन (विकास व विनियमन) अधिनियमन १९६३ मधील व नियम १९६७ मधील तरतुदीनुसार पणन मंडळाने १८ फेब्रुवारी रोजी या बाजारास परवाना दिला होता. मात्र या खाजगी बाजारामुळे येथील स्व.निवृत्ती काका देवरे बाजार समिती व समितींतर्गत सर्वच घटकांवर विपरीत परिणाम होणार असल्याने या खाजगी बाजाराचा परवाना रद्द करण्यात यावा यासाठी बाजार समिती व सचिव यांच्या वतीने आक्षेप नोंदविण्यात आला होता. त्या अनुषंगाने पणन संचालक सतीश सोनी यांनी १९ एप्रिलपर्यंत खाजगी रामेश्वर कृषी बाजाराचा परवाना तात्पुरता स्थगित केला असुन १९ एप्रिल रोजी बाजार समितीने उपस्थित केलेल्या मुद्द्यांच्या अनुषंगाने खाजगी बाजाराबाबत सखोल चौकशी करुन आवश्यक त्या कागदपत्रांसह अहवाल सुनावणीपुर्वी कार्यालयास सादर करण्याचे आदेश जिल्हा उपनिबंधकांना देण्यात आले आहेत. दरम्यान गुढीपाडव्याच्या( दि.१३) मुहूर्तावर खाजगी रामेश्वर कृषी बाजाराचा शुभारंभ करण्यात येणार होता. मात्र तात्पुरती स्थगिती दिल्याने खाजगी बाजार समितीचे संचालक काय निर्णय घेतात याकडे लक्ष लागून आहे.पणन मंडळाने तात्पुरती स्थगिती दिल्याचे पत्र आम्हाला अजून प्राप्त झाले नसून पत्र प्राप्त झाल्यानंतर खाजगी बाजाराबाबत काय आक्षेप आहेत यावर तोडगा काढू.- पुंडलिक देवरे, संचालक, खाजगी रामेश्वर बाजार.
खाजगी रामेश्वर कृषी बाजाराचा परवाना तात्पुरता स्थगित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 10, 2021 9:26 PM
उमराणे : गेल्या दोन महिन्यांपूर्वी महात्मा फुलेनगर ( ता.देवळा) येथील खाजगी रामेश्वर कृषी बाजाराला पणन मंडळाकडून परवाना देण्यात आला होता. मात्र येथील स्व.निवृत्ती काका देवरे कृषी उत्पन्न बाजार समितीने या खाजगी बाजाराबाबत आक्षेप घेतल्याने शासन निर्देशास अनुसरून पणन संचालक सतीश सोनी यांनी खाजगी रामेश्वर कृषी बाजाराचा परवाना तात्पुरता स्थगित केला आहे.
ठळक मुद्देपणन संचालकांचे आदेश : बाजार समितीने घेतला होता आक्षेप