शहरं
Join us  
Trending Stories
1
Vinod Tawde: हे गँगवॉर असू शकते...; विनोद तावडे प्रकरणात उद्धव ठाकरेंनी व्यक्त केला संशय
2
“५ कोटी कोणाच्या सेफमधून बाहेर आले?”; विनोद तावडे प्रकरणी राहुल गांधींचा PM मोदींना सवाल
3
विनोद तावडेंवर पैसे वाटपाचा आरोप; बविआचा राडा, निवडणूक आयोगाची पहिली प्रतिक्रिया काय?
4
राज्यातील 'हे' ३१ उमेदवार स्वतःला मत देऊ शकणार नाहीत! नक्की काय आहे प्रकरण?... वाचा
5
Amol Kolhe : "पैशाच्या जोरावर महाराष्ट्र जिंकायचा, गुजरातच्या दावणीला बांधायचा"; अमोल कोल्हेंचा भाजपावर हल्लाबोल
6
'पैशासाठी दिल्ली कॅपिटल्सचा संघ सोडलेला नाही...', IPL 2025 लिलावापूर्वी Rishabh Pant च्या पोस्टने खळबळ
7
मतदान एका दिवसावर! महायुती की मविआ?... हे मुद्दे विचारात घेऊन मतदार मत देणार…
8
Vinod Tawde : भाजप नेते विनोद तावडे यांच्यावर निवडणूक आयोगाची कारवाई, पैसे वाटल्याच्या आरोपावरून FIR दाखल
9
मणिपूरमध्ये वाद वाढला, एनडीएचा प्रस्ताव मैतेई संघटनेने फेटाळला; २४ तासांचा अल्टिमेटम दिला
10
“भाजप अन् विनोद तावडेंवर निवडणूक आयोगाने कठोर कारवाई करावी”: बाळासाहेब थोरात
11
Video - डान्स करतानाच नवरदेवाला आला हार्टअटॅक; वराती ऐवजी निघाली अंत्ययात्रा
12
विनोद तावडेंच्या डायरीत १५ कोटी रुपयांची नोंद; क्षितीज ठाकूर यांचा खळबळजनक आरोप
13
संपूर्ण महाराष्ट्रात २० नोव्हेंबरला सरकारी सुट्टी; शेअर बाजार-बँका बंद, पण...
14
शेत, प्लॉट मोजणीचे शुल्क किती, माहितेय का?
15
...अन् शेवटी तावडे आणि ठाकूर एकाच गाडीत बसून गेले; चार तासांत नेमकं काय-काय घडलं?
16
एवढा पैसा आला कुठून? विनोद तावडेंच्या आरोपावरून सुप्रिया सुळेंचा सवाल
17
‘एक है तो सेफ है’ घोषणेवरून लालूप्रसाद यादवांची भाजपासह साधूसंतांवर टीका, म्हणाले...  
18
Vinod Tawde: विनोद तावडे प्रकरणात ९,९३,५०० रुपये रक्कम सापडली; निवडणूक आयोगाची माहिती
19
IPL 2025: मेगा लिलावाआधी १९ वर्षीय मराठमोळ्या खेळाडूची रंगली चर्चा, कोण आहे तो?
20
“गृहखात्याने पाळत ठेवली अन् विनोद तावडे जाळ्यात अडकतील याचा बंदोबस्त केला”; राऊतांचा दावा

खासगी शिकवणी विधेयक स्वागतार्ह : संदीप झा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 08, 2018 6:29 PM

राज्य शासनाचा प्रस्तावित महाराष्ट्र खासगी शिकवणी अधिनियम 2018 कायद्याच्या अंमलबजावणीमुळे खासगी क्लासेसचालकांना कायदेशीर मान्यता मिळणार असल्याने सरकारचा हा निर्णय स्वागतार्ह आहे. या विधेयकामुळे खासगी क्लास संचालकांना शिक्षण क्षेत्रात आणखी बळ मिळून त्यांची कार्यशक्ती वाढणार आहे. परंतु वाढत्या कार्यशक्तीसोबतच विद्यार्थ्यांप्रती खासगी क्लासेस चालकांच्या जबाबदाऱ्याही वाढणार असल्याचे प्रतिपादन संदीप फाउंडेशनचे अध्यक्ष संदीप झा यांनी केले आहे.

ठळक मुद्देखासगी शिकवणी विधेयक स्वागतार्ह विधेयकामुळे खासगी क्लासेसला मान्यता मिळणारपीटीएच्या स्नेहमेळाव्यात संदीप झा यांचे प्रतिपादन

नाशिक : राज्य शासनाचा प्रस्तावित महाराष्ट्र खासगी शिकवणी अधिनियम 2018 कायद्याच्या अंमलबजावणीमुळे खासगी क्लासेसचालकांना कायदेशीर मान्यता मिळणार असल्याने सरकारचा हा निर्णय स्वागतार्ह आहे. या विधेयकामुळे खासगी क्लास संचालकांना शिक्षण क्षेत्रात आणखी बळ मिळून त्यांची कार्यशक्ती वाढणार आहे. परंतु वाढत्या कार्यशक्तीसोबतच विद्यार्थ्यांप्रती खासगी क्लासेस चालकांच्या जबाबदाऱ्याही वाढणार असल्याचे प्रतिपादन संदीप फाउंडेशनचे अध्यक्ष संदीप झा यांनी केले आहे.राज्य शासनाने कच्चा मसुद्यात प्रोफेशनल टीचर्स असोसिएशनने सुचविलेले बदल स्वीकारण्यात आल्यानंतर प्रोफेशनल टीचर्स असोसिएशनतर्फे (पीटीए) संदीप विद्यापीठात रविवारी (दि. 8) राज्यस्तरीय स्नेहमेळाव्यात खासगी कोचिंग क्लासेस क्षेत्रत प्रदीर्घ योगदान देणाऱ्या कोचिंग क्लास संचालकांचा भीष्माचार्य पुरस्कार व सावित्रीबाई फुले पुरस्काराने सन्मान करण्यात आला. यावेळी ते बोलत होते. व्यासपीठावर खासदार हरिश्चंद्र चव्हाण, महापौर रंजना भानसी, आमदार सीमा हिरे, देवयानी फरांदे, बाळासाहेब सानप, संदीप फाउंडेशनचे अध्यक्ष संदीप झा, प्रा. प्रशांत पाटील आदी उपस्थित होते. संदीप झा म्हणाले, खासगी क्लासेसचा व्यावसाय असंघटित आणि अनियंत्रित होता. परंतु, या विधेयकामुळे क्लासचालकांच्या व्यावसायाला शासकीय मान्यता मिळणार आहे. परंतु, क्लासचालकांनी आणि शिक्षकांनी काळानुसार बदलणारे तंत्रज्ञान व शिकविण्याचे तंत्र आत्मसात करण्याचे आवाहनही संदीप झा यांनी केले. दरम्यान, सरकार खासगी क्लासचालकांच्या पाठीशी उभे असून, खासगी क्लासचालकांच्या समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांच्यासह आमदार सीमा हिरे, बाळासाहेब सानप व देवयानी फरांदे यांनी क्लासचालकांच्या स्नेहमेळाव्यात दिले. शाळा महाविद्यालयांमधील शिक्षक क्लासेसमध्ये नोकरी करतात अथवा क्लासेस चालवितात त्यांना नियंत्रित करण्यासाठी शिकवणी विधेयक आणल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी पीटीएचे राज्यभरातील सदस्य व विविध जिल्ह्यांचे जिल्हाध्यक्ष उपस्थित होते. प्रास्ताविक पीटीएचे राज्याध्यक्ष बंडोपंत भूयार यांनी केले. सूत्रसंचालन जयंत मुळे यांनी केले.प्रदीर्घ योगदानासाठी पुरस्काराने गौरवक्लासचालकांच्या स्नेहमेळाव्यात नाशिकच्या यशवंत बोरसे यांच्यासह विविध जिल्ह्यांतील जगदीश वालावलकर, रणजित जाधव, राजगोंडा पाटील, तानाजी चव्हाण, वैजिनाथ खोसे, राजन जगताप, प्रवीण ठाकूर, सतीश नरहरे, तुकाराम मुरुडकर, विश्वंभर काठवटे, पंकज भोंगाडे, राजेंद्र भोसले, संतोष भळगट, भगवंत पाळवंदे, चंद्रकांत पराडकर, नंदलाल गादिया, रवींद्र दारव्हटकर, सुधीर यावलकर, वामन पवार, रतनलाल कोटेचा, अशोक देशमुख, नरेंद्रसिंग काछवाये, किशोर पारखे, मोहन गंधे यांना कोचिंग क्लासेस क्षेत्रत प्रदीर्घ योगदानासाठी भीष्माचार्य पुरस्कार देऊन गौरविण्यात आले, तर सीमा भट्टड, वनिता मोहिते, रेणुका बंगाले, रेणुका बारसल्ले, कमोदिनी वाडेकर व मीनाक्षी फडके या महिला संचालकांना सावित्रीबाई फुले पुरस्काराने गौरविण्यात आले.

टॅग्स :Education Sectorशिक्षण क्षेत्रTeacherशिक्षकStudentविद्यार्थीuniversityविद्यापीठ