नाशिक : शहरातील आर्जवी अरविंद काकुळते या दिव्यांग विद्यार्थिनीला महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक विभागीय मंडळाकडून तब्बल बारा हजार रुपयांचे पारितोषिक देण्यात आले आहे. आर्जवीने दिव्यांगातून गणित विषयात राज्यात प्रथम स्थानिक पटकावले असून, या कामगिरीसाठी तिला दहा हजार रुपयांचे, तर सामाजिकशास्त्र विषयांत मुलींमध्ये प्रथम क्रमांकासाठी एक हजार, गणित -१ व २ विषयात प्रथम क्रमांक विभागून एक हजार असे एकूण १२ हजार रुपयांचे पारितोषिक देऊन आर्जवीला गौरविण्यात आले आहे. मराठा विद्यालयाचे मुख्याध्यापक तथा म.वि.प्र.समाज संस्थेचे सेवक संचालक गुलाबराव भामरे यांच्या हस्ते सदर धनादेश आर्जवीला सुपूर्द करण्यात आला. याप्रसंगी विद्यालयाचे पुरुषोत्तम थोरात व रघुनाथ आहेर, हिरामण महाले, भाऊसाहेब पवार, विश्राम शिंदे, हेमराजगिरी गोसावी, सरिता संगमनेरे, कीर्ती बच्छाव, सरोज खालकर आदी उपस्थित होते.
दिव्यांग आर्जवीला एसएससी बोर्डाकडून १२ हजार रुपयांचे पारितोषिक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 09, 2020 4:11 AM