नाशिक : गेल्या तीन दिवसांपासून नाशिक जिल्ह्यात ठिकठिकाणी वादळ वाऱ्यासह जोरदार पाऊस होत असताना हवामान खात्याने येत्या चोवीस तासात उत्तर मध्य महाराष्टÑात विजांच्या कडकडाटासह जोरदार वादळी वाºयासह पाऊस कोसळण्याची शक्यता वर्तविली आहे. ४० ते ५० किलोमीटर प्रतिवेगाने वाहणाºया वाºयाच्या वेगामुळे उत्तर मध्य महाराष्टत जोरदार पर्जन्यवृष्टीचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. हवामान खात्याने दर्शविलेल्या शक्यतेमुळे जिल्हा प्रशासनाने आपत्ती व्यवस्थापन कक्षाला सतर्कतेचे आदेश दिले आहेत.यंदा तब्बल आठ दिवसांनंतर केरळमध्ये मान्सून दाखल झाल्यानंतर ७२ तासांनी महाराष्टत ठिकठिकाणी पावसाला सुरुवात झाली. गेल्या तीन ते चार दिवसांपासून नाशिकसह उत्तर महाराष्ट्रातदेखील मान्सूनच्या जोरदार सरी कोसळल्या. शनिवारी (दि.९) शहरात वादळ वाºयासह झालेल्या पावसामुळे अनेक ठिकाणी झाडे पडून नुकसान झाल्याचे तसेच वीजपुरठा विस्कळीत झाले असतानाच आता पुन्हा हवामान खात्याने वादळी पर्जन्यवृष्टीचा अंदाज वर्तविला आहे.येत्या चोवीस तासात उत्तर मध्य महाराष्टतील नाशिक, नगर आणि पुणे जिल्ह्यांमध्ये विजांचा कडकडाट आणि वादळ वाºयासह जोरदार पर्जन्यवृष्टी होणार असल्याने या तीनही जिल्ह्यांमध्ये जिल्हा प्रशासनाला तातडीच्या उपायोजना आणि आपत्ती व्यवस्थापनाला सतर्क ठेवण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. नाशिक जिल्ह्यातही त्या दृष्टीने आपत्ती व्यवस्थापन विभाग सतर्क ठेवण्यात आला आहे.
उत्तर मध्य महाराष्टत वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 09, 2019 6:21 PM