नांदूरवैद्य : कोरोनाच्या दिवसांत मुंबई पुण्याचे काही लोक आपल्या गावांकडे आगेकूच करतांना सर्वांनी पाहिले. जीवाच्या आकांताने सर्व कामगार गावांत उन्हाळयात स्थायिक झाल्या नंतर तालुक्यातील पिंपळगांव मोर येथील तरु ण कामगार ग्रुपने अनोखे कार्य करून दाखवले आहे. पिंपळगाव मोर येथील ‘ऋ णानुबंध’ कामगार ग्रुपने लोकडाऊनच्या काळात श्रमदान करून काम आणि दाम दोन्ही खर्च करून सलग २३ दिवस अथक प्रयत्न करून भैरवनाथ मंदिर येथे येणाऱ्या भाविकांचा व वाटसरूंचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न श्रमदानातुन मार्गी लावला आहे.भैरवनाथ मंदिराच्या पाठीमागे पारंपरिक प्राचीन विहीर असून त्यातून साधारण ४०० मीटर पर्यंत पाईपलाईन करून दाबाने पाणी रस्त्याजवळ बांधण्यात आलेल्या टाकीत सोडण्यात आले असुन टाकीला दोन नळ बसवले आहे. सदर मंदिर घोटी- टाकेद-भंडारदरा-कोल्हार रस्त्याला असल्यामुळे प्रवासी व वाटसरू यांना त्याचा फायदा होणार असुन सदर पिण्याचे पाणी गावाजवळील वाघ्याची वाडी व मोठी वाडी यांना देखील पाण्याचा फायदा होणार आहे.‘ऋ णानुबंध माझ्या मनातील माझा गाव’ या संकल्पनेतुन हे अनोखे काम केल्यामुळे त्यांचे कौतुक होत आहे. लोकडाऊन काळात गावी असणाºया कामगार बांधवांनी सामाजिक बांधिलकीतून सोश्ल डिस्टन्सींग पाळत काम-दाम खर्च करून मंदिरात दर्शनासाठी येणाºया भविकांचा पिण्याच्या पाण्याची टाकी बांधून पाण्याचा प्रश्न सोडवला. कामगार गृपने सुदाम महाराज गायकवाड यांच्या हस्ते सामाजिक अंतरचे सर्व नियम पाळून अतिशय साध्या पद्धतीने लोकार्पण सोहळा पार पाडला. यावेळी गावातील सर्व कामगार उपस्थित होते.
पिंपळगाव मोर येथील सोडविला पिण्याच्या पाण्याचा प्रश्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 23, 2020 5:30 PM
नांदूरवैद्य : कोरोनाच्या दिवसांत मुंबई पुण्याचे काही लोक आपल्या गावांकडे आगेकूच करतांना सर्वांनी पाहिले. जीवाच्या आकांताने सर्व कामगार गावांत उन्हाळयात स्थायिक झाल्या नंतर तालुक्यातील पिंपळगांव मोर येथील तरु ण कामगार ग्रुपने अनोखे कार्य करून दाखवले आहे.
ठळक मुद्देतरु ण कामगार ग्रुपचा पुढाकार : ग्रामस्थांमध्ये आनंदाचे वातावरण