सिडकोतील प्रभाग क्रमांक २६ मधील शिवशक्ती नगर व खुटवडनगर या भागात गेल्या अनेक महिन्यांपासून कमी दाबाने, अपुऱ्या स्वरूपात पाणीपुरवठा होत असल्याने या भागातील नागरिकांना नळासाठी खड्डा खणून त्यातून पाणी भरावे लागत होते. पुरेसे पाणी मिळत नसल्याने गेल्या अनेक वर्षांपासून नागरिक त्रस्त होते. यामुळे भाजप नगरसेविका अलका अहिरे यांनी महापालिकेकडे पाठपुरावा करून येथील महिलांचा पाणीप्रश्न कायमचा मिटावा यासाठी या परिसरात सुमारे वीस लक्ष लिटर जलकुंभ मंजूर करून आणला त्याच्या कामास सुरुवात करण्यात आली असून, यामुळे येथील नागरिकांचा आता पाणीप्रश्न सुटणार असून शिवशक्ती नगर व खुटवड नगर परिसर खड्डा मुक्त होणार असल्याचे अलका अहिरे व कैलास अहिरे यांनी सांगितले, याप्रसंगी दिनेश अहिरे, सुरेश गांगुर्डे, उखाजी चौधरी, नारायण वाघ, कारभारी देवरे, बालू बडगुजर, गोकुळ शिरोडे, सुनील बेलदार, हर्षाला देवरे, मेघा पाठक, प्रमिला वाघ, कल्पना नेहे आदी उपस्थित होते.
खुटवड नगर परिसरातील पाण्याचा प्रश्न मिटणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 02, 2021 4:12 AM