शहरं
Join us  
Trending Stories
1
Badlapur Case Accused Akshay Shinde, Police Encounter: बदलापूर अत्याचार प्रकरण: आरोपी अक्षय शिंदे पोलीस चकमकीत ठार! पोलिसांनी स्वसंरक्षणासाठी केला गोळीबार
2
बदलापूर प्रकरणातील आरोपी चकमकीत ठार! उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
3
"माझ्या पोराला पैसे देऊन मारून टाकलं", अक्षय शिंदेच्या आईचे गंभीर आरोप, दुपारीच घेतली होती भेट
4
भारतात मंकीपॉक्सचा रुग्ण आढळला, क्लेड १ बी व्हायरसची लागण, आरोग्य यंत्रणा सतर्क
5
रोहित पवारांना राम शिंदेंचा धक्का! कर्जत-जामखेडमधील दोन नेते भाजपात
6
Badlapur Case Accused Akshay Shinde: बदलापूर शालेय मुलींवर अत्याचार प्रकरण: मुख्य आरोपी अक्षय शिंदेचा आत्महत्येचा प्रयत्न; प्रकृती गंभीर
7
विशेष लष्करी रेल्वे गाडीखाली स्फोटके ठेवल्या प्रकरणी RPF ने एकाला घेतले ताब्यात
8
'या' दिवसापासून भाजप राबवणार मेगा सदस्यत्व अभियान, एक कोटी लोकांना जोडण्याचे लक्ष्य
9
"लहान आणि मोठे हुड्डा यांच्यात लढाई सुरू आहे...", अमित शाहांचा काँग्रेसवर हल्लाबोल, कुमारी सैलजा यांच्यावरही निशाणा
10
इस्रायलचे हिजबुल्लाहच्या अनेक ठिकाणांवर हवाई हल्ले, 100 ठार तर 400 जखमी
11
“दिल्लीत मोदींचे सरकार तयार झाले नसते, ४०० पार सांगत होते पण...”; शरद पवारांचे सूचक विधान 
12
“शेतकऱ्यांमुळे नरेंद्र मोदी पंतप्रधान, पण सत्तेत येताच त्यांना उद्ध्वस्त करायचे धोरण”: नाना पटोले
13
अजिंक्य रहाणेनं CM शिंदेंसह अजित पवार अन् फडणवीसांचे मानले खास आभार; जाणून घ्या कारण
14
“जनतेचे प्रश्न सोडवण्यात भाजपा महायुती सरकार अपयशी, फक्त पैसा वसुली...”: रमेश चेन्नीथला
15
मनोज जरांगेंची मागणी योग्यच, आमचा त्यांना पाठिंबा, पण...; शरद पवारांनी स्पष्ट केली भूमिका
16
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी: दुधाच्या अनुदानात वाढ; मंत्रिमंडळ बैठकीत २३ मोठे निर्णय
17
'३४ वर्ष वाट पाहिली अन्..'; 'लापता लेडीज'ची ऑस्कर २०२५ मध्ये एन्ट्री होताच रवी किशन भावुक
18
Nicholas Pooran ला तोड नाही; कॅरेबियन गड्यानं सेट केला षटकारांचा 'महा-रेकॉर्ड'
19
Video : रस्त्यावरील खड्ड्याने केंद्रीय मंत्र्याचीच केली फजिती, शिवराज सिंह चौहानांचा व्हिडीओ व्हायरल
20
"...तर ईश्वर आम्हाला माफ करणार नाही", 'हिट अ‍ॅण्ड रन' घटनेवर उच्च न्यायालय काय म्हणाले?

वेतन आयोग लागू होण्यास अडचण

By admin | Published: November 08, 2016 1:36 AM

निवेदन : माजी पदाधिकाऱ्यांकडून दिशाभूल झाल्याचा आरोप

नाशिकरोड : मुद्रणालयाचे महामंडळात रूपांतर करताना मजदूर संघाच्या माजी पदाधिकाऱ्यांनी केलेल्या करारामुळेच सातवा वेतन आयोग लागू होण्यास अडचण निर्माण झाली असून, ते कामगारांची व लोकप्रतिनिधींची दिशाभूल करत आहे, असे निवेदनात म्हटले आहे.  मुद्रणालय मजदूर संघाच्या वतीने खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांना देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, आम्ही सत्तारूढ असून मुद्रणालय, महामंडळ व्यवस्थापन व नवी दिल्लीत बैठकीला जाण्याचा, कामगारांच्या प्रश्नाविषयी बैठक घेऊन निर्णय घेण्याचा अधिकार आहे. ज्या माजी पदाधिकाऱ्यांनी आपल्याला निवेदन दिले आहे ते २००८ मध्ये सत्तेत होते. तेव्हा मुद्रणालयाचे महामंडळात रुपांतर करताना झालेल्या त्रिपक्षीय करारात मुद्दा क्र. ८ मध्ये त्यांनी महामंडळात सामील झाल्यानंतर आम्हास पब्लिक अंडरटेकिंग सेक्टर प्रमाणे पे-स्केल देण्याचे मान्य केले होते. त्यामुळेच आता सातवा वेतन आयोग कामगारांना लागू करण्यास मुद्रणालय महामंडळ व्यवस्थापन तयार नाही. आम्ही केंद्रीय कर्मचारी नसल्यामुळे केंद्र शासन आम्हाला डायरेक्ट सातवा वेतन आयोग देऊ शकत नाही. मात्र आम्ही महामंडळ व्यवस्थापनाचे आमचे पे-रिव्हजन १ जानेवारी २०१६ पासून सातवा वेतन आयोगाच्या पे-स्केलप्रमाणे करावे असा ठराव नऊ युनिटमधील सर्व मान्यता प्राप्त संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी दिला आहे. त्यानुसार कायदेशीर प्रक्रिया सुरु झाली असून, चर्चादेखील सुरु आहे. त्यामुळे लोकप्रतिनिधी व कामगारांची दिशाभूल करू नये असे आवाहन निवेदनात करण्यात आले आहे.निवेदनावर मजदूर संघाचे सरचिटणीस जगदीश गोडसे, कार्याध्यक्ष ज्ञानेश्वर जुंद्रे, सुनील आहिरे, अण्णा सोनवणे, भीमराव साळवे, मनोज सोनवणे, राजू लहामगे आदिंच्या सह्या आहेत. (प्रतिनिधी)