सिडको : मोरवाडीतील श्री स्वामी समर्थ रुग्णालयात गंभीर आजारी असलेल्या रुग्णांसाठी अतिदक्षता विभागच नसल्याचा प्रकार शिवसेना नगरसेवकांच्या भेटीत उघड झाला. इतकेच नव्हे तर प्रसूतीसाठी असलेल्या या रुग्णालयात सोनोग्राफी मशीनच नसल्याने उपचार होण्यास अडचण येत असल्याची समस्या यावेळी दिसून आली.मोरवाडीसारख्या या कामगार वसाहतीतील रुग्णालयात प्रसूतीगृह असतानाही सोनोग्राफीचे मशीन नसल्याने सेना पदाधिकाऱ्यांनी आश्चर्य व्यक्त केले. महिला रुग्णांना सोनोग्राफीसाठी बाहेर खासगी रुग्णालयात पाठवित असल्याचा प्रकार समोर आला. नगरसेवकांनी रुग्णालयाची पाहणी करून चौकशी केली. यावेळी विरोधी पक्षनेते बोरस्ते यांनी यासंदर्भात महासभेत आयुक्तांना जाब विचारण्यात येणार असल्याचे सांगितले. यावेळी गटनेते विलास शिंदे, सिडको प्रभाग सभापती हर्षा बडगुजर, सुधाकर बडगुजर, डी.जी. सूर्यवंशी, श्यामकुमार साबळे, प्रवीण तिदमे, चंद्रकांत खाडे, कल्पना पांडे, किरण गामणे, दीपक दातीर, सुदाम डेमसे, कावेरी घुगे, भूषण राणे, दीपक मटाले, बाळा दराडे यांच्यासह नगरसेवक उपस्थित होते.महापालिकेच्या रुग्णालयांच्या सुविधांवर लक्ष ठेवण्यासाठी रु ग्ण कल्याण समितीची स्थापना करण्यात आली असली तरी आजपर्यंत या समितीसाठी एकही बैठक या रु ग्णालयात झाली नसल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे समिती स्थापन करून उपयोग काय असादेखील प्रश्न निर्माण झाला.
रुग्णालयात सोनोग्राफी मशीनच नसल्याने अडचण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 13, 2018 12:17 AM
मोरवाडीतील श्री स्वामी समर्थ रुग्णालयात गंभीर आजारी असलेल्या रुग्णांसाठी अतिदक्षता विभागच नसल्याचा प्रकार शिवसेना नगरसेवकांच्या भेटीत उघड झाला. इतकेच नव्हे तर प्रसूतीसाठी असलेल्या या रुग्णालयात सोनोग्राफी मशीनच नसल्याने उपचार होण्यास अडचण येत असल्याची समस्या यावेळी दिसून आली.
ठळक मुद्देसेनेची धडक मोरवाडीत अतिदक्षता विभाग नाही; रुग्णांचे हाल