डांगसौदाणे : बागलाण तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यातील ३८ खेड्यांची मुख्य बाजारपेठ असलेल्या डांगसौदाणे येथे दर मंगळवारी भरणारा आठवडे बाजार अपुऱ्या सोयीसुविधांअभावी स्थानिकांसह बाजारासाठी येणाºया व्यापारी व खरेदीदारांसाठी अडचणीचा ठरत असल्याचे दृश्य सध्या पहावयास मिळत आहे. याबाबती अडचणी सोडविण्यात ग्रामपंचायत प्रशासनालाही अपयश आले आहे. मंगळवारी भरणाºया या बाजारासाठी आदिवासी खेड्यापाड्यावरून हजारो लोकांची वर्दळ पहावयास मिळते. लाखो रुपयांची उलाढाल असलेल्या या आठवडे बाजारात मात्र मागील काही वर्षांपासून सार्वजनिक सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यात ग्रामपंचायतला अपयश आल्याने आठवडे बाजार विविध समस्यांच्या विळख्यात सापडला आहे. वार्षिक ६ ते ७ लाख रुपये आठवडे बाजार लिलावापोटी उत्पन्न असणाºया डांगसौदाणे ग्रामपंचायत प्रशासन मात्र बाजारपेठेच्या आवारातील सोयी-सुविधा सोडविण्यात कमी पडत असल्याचे चित्र सद्य:स्थितीत पहावयास मिळत आहे. अवैध वाहतूक : आठवडे बाजाराच्या दिवशी आदिवासी भागातील खेड्या-पाड्यांवरून बाजारासाठी येणाºया प्रवाशांना एसटी बस न मिळाल्यास खासगी वाहनांचा वाहनांचा आसरा घ्यावा लागतो. अवैध वाहतूक करणारे वाहनधारक क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी बसवून वाहतूक करताना दिसतात. बाजारपेठेच्या मुख्य प्रवेशद्वारावर वाहने उभी करून प्रवासी मिळविण्यासाठी या चालकांची धडपड सुरू असते. मात्र या त्यांच्या चढाओढीत बाजारपेठेच्या मुख्य प्रवेशद्वारावर वाहतुकीची मोठी कोंडी होत आहे. शेतकºयांना या आठवडे बाजारात आल्यानंतर बाजार कमिटी व ग्रामपंचायत प्रशासन अशा दोन कर पावत्या फाडाव्या लागत असल्यामुळे शेतकºयांनी ग्रामपंचायतविरुद्ध नाराजी व्यक्त केली आहे. बाजाराच्या दिवशी बसस्थानकात अवैध वाहनधारकांचे वर्चस्व पहावयास मिळते. त्यांच्या गर्दीमुळे एसटी महामंडळाच्या बसेस बसस्थानकात येतच नाहीत. बायपासवरूनच बस निघून जात असल्याने प्रवाशांचे अतोनात हाल होत असल्याचे चित्र आहे. याचे कुठलेही गांभीर्य ग्रामपंचायत अथवा पोलिसांना दिसून येत नाही. बसस्थानकावरील जागेवर बाजाराच्या दिवशी अस्ताव्यस्त अवस्थेत लावलेल्या दुचाकीमुळे बाजारासाठी आलेल्या नागरिकांना बाजारपेठेत जाण्यासाठी चाचपडत मार्ग काढावा लागतो. याबरोबर दुकानांसमोर मनमानी पद्धतीने लावलेल्या या दुचाकींमुळे बसस्थानकांवरील व्यापारी गाळेधारकांच्या व्यवसायावर मोठा परिणाम होत आहे. दुकानात जाण्यासाठी जागाच नसल्यामुळे ग्राहक परत जात असल्याची प्रतिक्रि या या व्यापारी वर्गाने व्यक्त केली आहे. ग्रामपंचायत प्रशासनाने दुचाकी पार्किंगसाठी जागा उपलब्ध करून दिली होती; मात्र त्यावर अंमलबजावणी करताना प्रशासन कमी पडल्याचे व्यापारी वर्गाकडून बोलले जात आहे. भाजीपाला मार्केटमध्ये फिरणाºया मोकाट गाई व वळूमुळे महिला वर्गात प्रचंड दहशतीचे वातावरण पहावयास मिळत आहे. या मोकाट जनावरांकडून काही महिलांना धडक देण्याचे प्रकारही घडले आहेत. तर भाजीपाला विक्र ेत्यांच्या भाजीच्या जुड्या पळविणे, महिलांच्या हातातील पिशव्यांमधील भाजीपाला ओढणे, महिलांवर धावून जाणे असे प्रकार पहावयास मिळत आहेत. काही अनुचित प्रकार घडण्या आधी या मोकाट जनावरांचा बंदोबस्त ग्रामपंचायत प्रशासनाने करावा, अशीही मागणी जोर धरत आहे.
आठवडे बाजाराला समस्यांचा विळखा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 24, 2018 12:15 AM