पंचवटी : पंचवटी प्रभाग समिती सभापतींचा कार्यकाल पूर्ण झाला तरी पंचवटी प्रभागातील नागरी समस्या ‘जैसे थे’ असल्याचे सांगून सत्ताधारी भाजपाच्या नगरसेवकांनी भाजपालाच घरचा अहेर दिला. पंचवटी प्रभाग समितीची यंदाच्या वर्षातील शेवटची मासिक बैठक सभापती प्रियंका माने यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी झालेल्या बैठकीत सत्ताधारी भाजपाच्या नगरसेवकांनी प्रभागात पिण्याच्या पाण्याची समस्या, अनियमित घंटागाडी, पिण्याच्या पाण्याची जलवाहिनी बदललेली नाही अशा विविध तक्रारी मांडून सभापती भाजपाच्या असल्या तरी तसेच सभापतींचा कार्यकाल पूर्ण होत आला असतानाही समस्या सुटलेल्या नसल्याची खंत मांडून एकप्रकारे भाजपाच्या नगरसेवकांनी सत्ताधारी भाजपाला घरचा अहेर दिला आहे. यावेळी झालेल्या बैठकीत गेल्या महिन्यात झालेल्या सभेचे इतिवृत्त कायम करावे तसेच गेल्या अनेक महिन्यांपासून पंचवटी विभागात प्रभारी उद्यान निरीक्षक म्हणून काम करणाऱ्या राहुल खांदवे यांचा अनुभव बघून त्यांची पंचवटी उद्यान निरीक्षकपदी नियुक्ती करावी असा ठराव मांडण्यात आला. यावेळी झालेल्या बैठकीत माने यांनी संबंधित विभागाने नगरसेवकांच्या समस्या ऐकून त्या तातडीने सोडविण्याचे काम करावे, अशा सूचना मनपाच्या अधिकारी व कर्मचाºयांना दिल्या. यावेळी झालेल्या बैठकीत नगरसेवक शीतल माळोदे, पूनम मोगरे, प्रा. सरिता सोनवणे, पूनम धनगर, मिच्छंद्र सानप, सुरेश खेताडे, नगररचना विभागाचे दौलत घुगे, आर. एम. शिंदे, वसंत ढुमसे, बांधकामचे नितीन पाटील, आरोग्याचे संजय दराडे आदी उपस्थित होते.सभागृहात पुन्हा झेरॉक्स नगरसेवकगुरु वारी (दि. २१) पंचवटी प्रभाग समितीची यंदाच्या वर्षातील शेवटची सभा सभापती प्रियंका माने यांच्या अध्यक्षतेखाली झाली. बैठकीत सत्ताधारी भाजपा नगरसेवकांची कामे करणाºया झेरॉक्स नगरसेवकांनी पुन्हा एकदा सभागृहात प्रवेश मिळवून बैठकीत ठिय्या मांडला होता. कोणतेही पद नसताना केवळ झेरॉक्स नगरसेवक म्हणून सभागृहात प्रवेश करणाºयांवर प्रशासनाचे नियंत्रण नसल्याचे दिसून येते. गुरु वारी झालेल्या बैठकीत झेरॉक्स नगरसेवकांपाठोपाठ त्यांच्या कार्यकर्त्यांनीही सभागृहात बैठकीला हजेरी लावल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
पंचवटी प्रभागात समस्या ‘जैसे थे’?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 24, 2018 12:48 AM