नाशिक : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण महाराष्ट्रासह देशभरात संचारबंदी लागू असताना सरकारने जीवनावश्यक साहित्याची वाहतूक करणारी वाहने आणि दुकाने सुरू ठेवण्यास सूट दिली आहे. मात्र विविध जिल्ह्णांतून नाशिककडे येणाºया वाहनांच्या कोंडीत भाजीपाल्याची वाहतूक करणारी वाहनेही अडकली असून, कृषिमालाच्या पॅकिंगसाठी आवश्यक साहित्य प्रक्रिया उद्योगांपर्यंत पोहचविणारी वाहनेही विविध भागात अडकल्याने कृषिमाल प्रक्रिया व वितरण करणाºया उद्योगांना वेगवेगळ्या समस्यांचा सामना करावा लागत आहे.नाशिक जिल्ह्णातून मुंबईला मोठ्या प्रमाणात भाजीपाला व फळबाज्यांच्या पुरवठा केला जातो. यात नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीसह गिरणारे, पिंपळगाव, लासलगाव, निफाड, इगतपुरीतील घोटी व पांढुर्ली या भागातून अनेक व्यापारी मोठ्या प्रमाणात भाजीपाला खरेदी करून मुंबईला पोहोचवितात. परंतु, गेल्या तीन ते चार दिवसांत या व्यापाऱ्यांची वाहने मुंबईहून नाशिकच्या दिशेने परतताना अनेक अडचणी येत आहेत. काही वाहनचालक मुंबईतून बाहेर पडणाºया प्रवाशांना वाहनात जागा देण्याचा प्रकार घडत असल्याने पोलिसांकडून अशा वाहनांची कसून चौकशी होत आहे. तर दुसरीकडे काही वाहने वाहतूक कोंडीत अडकल्याने वेळेत परतू न शकल्याने व्यापाºयांनी मर्यादित भाजीपाला खरेदी केला. त्यामुळे गेल्या दोन दिवसांत अनेक शेतकºयांच्या कृषिमालाची विक्री होऊ शकली नाही.दरम्यान, यासंदर्भात कृषिमाल प्रक्रिया उद्योजक व शेतकरी प्रतिनिधींनी जिल्हाधिकारी सूरज मांढरे व पालकमंत्री छगन भुजबळ यांची भेट घेऊन शेतकºयांच्या समस्यांविषयी माहिती दिली असून, प्रशासनाकडून शेतकºयांच्या समस्या दूर करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.नाशिक जिल्ह्णातील विविध कृषिमाल प्रक्रिया उद्योगांना पॅकिंसाठी लागणारे साहित्य उपलब्ध होत नसल्याने अडचणी येत आहेत. त्याचप्रमाणे कृषिमाल उचलण्यासाठी विविध गावांमध्ये फिरणाºया वाहनांना स्थानिक नागरिकांकडून गावाच्या परिसरात येण्यास मज्जाव केला जात असल्याने कृषिमालाचे संकलन करण्याचे आव्हान या उद्योगांसमोर निर्माण झाले आहे. याचा थेट परिणाम स्थानिक बाजारपेठेतील विक्रीसोबच निर्यातीवर होत असल्याने कृषी प्रक्रिया उद्योगही संकटात सापडल्याचे चित्र निर्माण झाले आहे.
कृषिमाल वाहतुकीची समस्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 25, 2020 11:33 PM
नाशिक : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण महाराष्ट्रासह देशभरात संचारबंदी लागू असताना सरकारने जीवनावश्यक साहित्याची वाहतूक करणारी वाहने आणि दुकाने सुरू ...
ठळक मुद्देशेतकऱ्यांमध्ये भीती : माल संकलन करणारी वाहने अडविण्याचे प्रकार