इन्फो
लाॅकडाऊनचा फटका
नाशिक-कळवण हा रस्ता हायब्रीड ॲन्युटीमधून होत आहे. मात्र, गेली तीन वर्षे झाली, तरी शहरातील रस्ता झालेला नाही. नगरपंचायतीने सदर रस्त्याच्या दुतर्फा गटारी करण्याचे नियोजन केले. मात्र, हे काम रस्त्याच्या कामात सार्वजनिक बांधकाम करणार आहे. त्या विभागाकडून रस्त्याचे काम सुरू होत नसल्याने गटारीचा प्रश्न रस्त्यासोबतच प्रलंबित आहे. पालखेड रोडला भुयारी गटारचे काम झाले आहे, पण सदर रस्त्याचे नूतनीकरण होत असताना, ते धिम्या पद्धतीने होत असल्याचे आरोप-प्रत्यारोप होत काम बंद पडले. आता सदर रस्त्याची मंजुरी व इतर सोपस्कार पार पडले आहे, पण लॉकडाऊनमुळे सदर काम बंद असून, निर्बंध शिथिल होताच काम सुरू होईल, असे सांगितले जात आहे.
कोट.... दिंडोरी नगरपंचायत हद्दीत बहुतांशी गटारी भुयारी करण्यात आल्या असून, नियमित साफसफाई करण्यात येते. पावसाळापूर्व साफसफाईची कामे करण्यात आली आहेत. वीजपुरवठ्यास अडचण ठरणाऱ्या फांद्या तोडण्यास परवानगी दिली आहे. नाशिक-कळवण रस्त्यालगतच्या गटारी, स्वच्छताप्रश्नी बांधकाम विभागाशी समन्वय साधून मार्ग काढला जाईल. सुरू असलेली विकासकामे लवकरात लवकर करण्याच्या सूचना संबंधितांना देण्यात आल्या आहेत.
- नागेश येवले, मुख्याधिकारी, नगरपंचायत
दिंडोरी फोटो- २९ दिंडोरी रोड
===Photopath===
290521\495429nsk_26_29052021_13.jpg
===Caption===
फोटो- २९ दिंडोरी रोड