नाशिक : लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता संपुष्टात येताच, महापालिकेच्या कर्मचारी, अधिकाऱ्यांची मोठ्या प्रमाणात खांदेपालट होणार असून, त्यादृष्टीने महापालिका आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी तीन वर्षांपेक्षा अधिक काळ एकाच ठिकाणी काम करणाºया कर्मचाºयांच्या बदल्या करण्याचे निर्देश विभागप्रमुखांना दिले आहेत. त्यानुसार विभागप्रमुखांकडून यासंदर्भात माहिती गोळा करण्याचे काम सुरू झाले आहे.दरवर्षी साधारणत: एप्रिल-मे महिन्यांत कर्मचारी, अधिकाºयांच्या बदल्या केल्या जातात. परंतु यंदा लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता मार्च महिन्यातच जारी झाल्यामुळे या संदर्भातील सर्व हालचाली मंदावल्या आहेत. आता मात्र २३ मे रोजी मतमोजणी झाल्यानंतर आयोगाकडून आचारसंहिता संपुष्टात आणली जाणार आहे. त्यामुळे जूनपूर्वीच बदल्या करण्याची तयारी केली जात आहे. माजी आयुक्त तुकाराम मुंढे यांनी आपल्या कार्यकाळात अधिकारी व कर्मचाºयांच्या बदल्या केल्या होत्या.तीन वर्षांपेक्षा जास्त काळ एकाच ठिकाणी काम करणाºया कर्मचाºयांच्या बदल्या केल्या होत्या. यात बांधकाम व नगररचना विभागातील उपअभियंत्यांचा मोठ्या प्रमाणात सहभाग होता. मात्र आयुक्त मुंढे यांची बदली झाल्यानंतर काही कर्मचारी, अधिकारी पुन्हा आपल्या मूळच्या जागेवर आले होते. ही बाब लक्षात घेत आता आयुक्त गमे यांनी तीन वर्षांपेक्षा जास्त काळ एकाच जागेवर काम करणाºया अधिकारी व कर्मचाºयांच्या बदल्या करण्याचा निर्णय घेतला असून, यासंदर्भातील माहिती जमा करून अहवाल विभागप्रमुखांकडून मागविण्यात आला आहे.अहवालानंतर निघणार आदेशआता विभागप्रमुखांकडून आपल्या विभागात काम करणाºया व तीन वर्षे किंवा त्यापेक्षा जास्त काळ झालेल्या कर्मचाºयांची माहिती जमा करण्याचे काम सुरू केले आहे. तसेच संबंधित कर्मचाºयाने यापूर्वी कोणकोणत्या विभागात काम केले, सर्वांत जास्त काळ कोणत्या विभागात काम केले, याची माहिती अहवालात मागविण्यात आली आहे. हे अहवाल विभागप्रमुखांकडून मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात आल्यानंतर जूनच्या पहिल्या आठवड्यात बदल्यांचे आदेश निघण्याची शक्यता आहे.
महापालिका कर्मचाऱ्यांच्या बदल्यांची प्रक्रिया सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 19, 2019 12:20 AM