मुंजवाड : अनेक वर्षांपासून दुष्काळाच्या छायेत असलेल्या मुंजवाड परिसरात या वर्षी समाधानकारक पाऊस झाल्याने बळीराजाने मोठ्या उत्साहात पोळ्याचा सण साजरा केला. पोलीसपाटील दीपक सूर्यवंशी, मल्हारवाडी परिसर, वेताळवाडी व पाडगण परिसरातील शेतकऱ्यांनी यावर्षी ढोल ताशाच्या गजरात सर्जा-राजाची मिरवणूक काढली. बळीराजाने आपल्या सर्जा-राजाला सवजून त्याची वाजत-गाजत मिरवणूक काढल्याने संपूर्ण गावात आनंदाचे वातावरण निर्माण झाले होते. (वार्ताहर)
मुंजवाडला बैलांची मिरवणूक
By admin | Published: September 02, 2016 9:52 PM