येवला : येथील जैन समाजाच्या वतीने श्रीमद् विजय रामचंद्र सुरेश्वरजी महाराज यांचे शिष्य महाराष्ट्र केसरी देशोद्धारक श्रीमद् विजय यशोदेव सुरेश्वरजी महाराज यांच्या स्वर्गरोहण तिथीनिमित्त त्यांच्या प्रतिमेसह महावीरांच्या प्रतिमेची पालखीतून मिरवणूक काढण्यात आली.दर वर्षी कार्तिक शुद्ध चतुर्थीला जैन बांधव मिरवणूक काढतात. सालाबादप्रमाणे यंदाही शुक्रवारी सकाळी साडेनऊ वाजेच्या सुमारास येथील दिगंबर जैन मंदिरात भगवान महावीरांच्या मूर्तीला अभिर्षेक करण्यात येऊन श्रीमद् विजय रामचंद्र सुरेश्वरजी, श्रीमद् विजय याशोदेव सुरेश्वरजी यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. शहरातून पटणी गल्ली, शिंपी गल्ली, मेनरोड सराफ फाटा, बालाजी गल्ली, नगरपालिका रोडमार्गे मिरवणूक काढण्यात आली. मिरवणूक मार्गात भाविकांनी रांगोळी काढली होती. पालखीचे समाजबांधवांकडून घरोघरी पूजन करण्यात आले. यानंतर दुपारी १२ वाजता दिगंबर जैन मंदिरात झालेल्या कार्यक्रमात शेखर मेहता यांनी श्रीमद् विजय यशोदेव सुरेश्वरजी महाराज यांनी नवकार मंत्राची ३५ करोड जप आराधना केल्याचा उल्लेख केला. महाप्रसादाने कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला. भगवान महावीरांची पालखी नेण्याचे काम सागर पटणी, विनय पटणी, अजय पटणी, अमरीश पटणी, अजय पटणी, निखिल पटणी, यांनी केले. मिरवणुकीत गीतापूर्णाश्रीजी म.सा. आदी ठाणा ६ यांच्यासह, अभय पटणी, स्नेहल पटणी, सुरज पटणी, सतीश पटणी, अनिल मंडलेचा, सतीश समदडिया, अभय पटणी, अमित पटणी, शेखर मेहता, प्रीतम पटणी, गुलाब महाले, सुहास पटणी, विलास पटणी, जगदीश पटणी, सोनल पटणी, दिलीप पटणी, सचिन पटणी, अशोक पटणी, निखिल पटणी, विद्युत मेहता, साकरचंद मंडलेचा, संकेत पटणी, अशोक पटणी, नीलम पटणी, सोनल पटणी, रुपाली पटणी, अमृता पटणी, पूजा पटणी, मयूरी पटणी, नेहा पटणी, भावना पटणी, अल्का मुथा, ऊर्मिला पटणी, रोहिणी पटणी, सुषमा पटणी, समीक्षा पटणी, पायल पटणी, काश्मिरा पटणी, प्रणीता पटणी,प्रीती लोढा ,नीता शहा,आदि सहभागी झाले होते. (वार्ताहर
जैन बांधवांनी काढली मिरवणूक
By admin | Published: November 05, 2016 12:49 AM