नाशिक : भगवान झुलेलाल यांचा जयंती उत्सव सिंधी बांधवांनी रविवारी (दि. १८) उत्साहात साजरा केला. सिंधी समाजाने झुलेलाल जयंती उत्सवानिमित्त दरवर्षीप्रमाणे ‘चेट्रीचंड’ नववर्ष स्वागतोत्सव उत्साहात साजरा करतानाच शालिमार ते गोदाघाट रामकुंडापर्यंत मिरवणूक काढून व भगवान झुलेलाल यांचा जयघोष करीत नववर्षाचा जल्लोष केला. शालिमार चौकातील हनुमान मंदिराजवळ असलेल्या भगवान झुलेलाल यांच्या मंदिराच्या आवारात डॉ. विजय महाराज व सुनील महाराज यांच्या हस्ते पारंपरिकरीत्या पूजन करण्यात आले. यावेळी सिंधी बांधवांनी भगवान झुलेलाल यांच्याकडे विश्व कल्याणासाठी प्रार्थना केली. त्यानंतर शालिमार चौकातून ढोल- ताशांच्या गजरात काढण्यात आली. या मिरवणुकीत भगवान झुलेलाल, संत कुंवरलाल व साईबाबा यांचा चित्ररथांनी सर्वांचेच लक्ष वेधून घेत. यावेळी मिरवणुकीत सहभागी समाजबांधवांनी संत बैराना साहेबांच्या पालखीचे दर्शन घेतले. शहरातील विविध राजकीय पक्षाच्या नेत्यांसह विविध लोकप्रतिनिधींनी याठिकाणी मिरवणुकीला भेट देऊन सिंधी बांधवांना झुलेलाल जयंती व नववर्षाच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष किशन अडवाणी, अशोक पंजाबी यांच्यासह नाणकीराम बदणानी, शंकर जियसंगानी, किशोर अमरणानी, शोम मोरवाणी, सुरेश खुबानी, अर्जुन कटपाल, जगदीश नंदवानी, राजू पंजाबी आदि समाजबांधवांनी सहभाग घेतला. या मिरवणुकीत यावर्षी प्रथमच महिलांनीही सहभाग घेतला होता. समाजबांधवांचा सहभागचेट्रीचंड उत्सवानिमित्त शहरातून काढण्यात आलेल्या मिरवणुकीत सहभागी सिंधी समाजबांधवांनी ढोल-ताशांच्या तालावर ठेका धरला. शालिमार चौकातून निघालेली ही मिरवणूक शिवाजीरोड, मेनरोड, धुमाळ पॉर्इंट, रविवार कारंजा, स्टॅण्डमार्गे रामकुंडावर पोहोचल्यानंतर या मिरवणुकीत समारोप झाला.नाशिकरोड येथेही मिरवणूकसिंधी नववर्ष व भगवान श्री झुलेलाल यांच्या जयंतीचा कार्यक्र म (चेट्रीचंड) नाशिकरोडच्या सिंधी बांधवांतर्फे उत्साहात साजरा करण्यात आला. जेलरोडच्या कलानगर येथील झुलेलाल मंदिरात सकाळी मान्यवरांच्या हस्ते आरती करण्यात आली. लक्ष्मण कारडा, मनीष देवानी, दीपक तोलानी, किशोर कारडा यांच्या हस्ते पूजा करण्यात आली. नगरसेवक संभाजी मोरु स्कर, रमेश धोंगडे, सीमा ताजणे, अशोक केशवानी, जगदीश रामनानी, राजनशेठ दलवानी, नरेश कारडा, नरेश गारानी आदींची उपस्थिती होती. यानिमित्ताने सिंधी गीत व भावगीतांचा कार्यक्र म उत्साहात झाला. दुपारी शोभायात्रा काढण्यात आली. झुलेलाल मंदिरापासून महाराजांच्या प्रतिमेची सजवलेल्या रथातून शोभायात्रा निघाली. बिटको चौकमार्गे शिवाजी पुतळापर्यंत नेऊन शोभायात्रेचा समारोप करण्यात आला.
चेट्रीचंड उत्सवानिमित्त शहरातून मिरवणूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 19, 2018 1:44 AM
नाशिक : भगवान झुलेलाल यांचा जयंती उत्सव सिंधी बांधवांनी रविवारी (दि. १८) उत्साहात साजरा केला. सिंधी समाजाने झुलेलाल जयंती उत्सवानिमित्त दरवर्षीप्रमाणे ‘चेट्रीचंड’ नववर्ष स्वागतोत्सव उत्साहात साजरा करतानाच शालिमार ते गोदाघाट रामकुंडापर्यंत मिरवणूक काढून व भगवान झुलेलाल यांचा जयघोष करीत नववर्षाचा जल्लोष केला. शालिमार चौकातील हनुमान मंदिराजवळ असलेल्या भगवान झुलेलाल यांच्या मंदिराच्या ...
ठळक मुद्देसिंधी नववर्षाचे स्वागत : भगवान झुलेलाल यांचा जयघोष