लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : ‘बुद्धं शरणं गच्छामी’ अशी प्रार्थना करत अनेक साधकांनी बुद्ध पौर्णिमेनिमित्त बुधवारी (दि. १०) शहरातून काढण्यात आलेल्या मिरवणुकीत मोठ्या संख्येने सहभाग नोंदविला. यावेळी चित्ररथांमध्ये गौतम बुद्धांची मूर्ती ठेवण्यात आली होती.शांतिदूत चॅरिटेबल ट्रस्ट, नाशिक आणि नाशिक महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने बुद्ध पौर्णिमेनिमित्त या मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले होते. या मिरवणुकीत चित्ररथांचादेखील समावेश करण्यात आला होता. शालिमार चौकातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यापासून या मिरवणुकीला शांतिदूत चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष भदन्त सुदन्त आणि भदन्त आर्यनाग यांच्या प्रमुख उपस्थितीत सुरुवात झाली. शालिमार येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापासून सुरू झालेल्या या मिरवणुकीचा एम. जी. रोड, जुने सीबीएस, त्र्यंबक नाका, सातपूर, राजवाडा, स्वारबाबानगर, त्रिमूर्ती चौक सिडको, शुभम पार्क, पाथर्डी फाटा मार्गे बुद्ध स्मारक येथे समारोप करण्यात आला. दरम्यान, नाशिकरोड, सिडको, पंचवटी, इंदिरानगर, सातपूर आदि भागात बुद्ध पौर्णिमेनिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
शहरातून मिरवणूक
By admin | Published: May 11, 2017 2:19 AM