वणी : आगामी गणेशोत्सव साजरा करताना पोलीस प्रशासन परवानगी, कोविड नियमांचे पालन, सार्वजनिक धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांवर बंधने, वाद्ये व मिरवणुकीस बंदी या सर्वांचे पालन करून गणेशोत्सव साजरा करण्याचे आवाहन उपविभागीय अधिकारी अमोल गायकवाड यांनी केले.आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शांतता समितीच्या या बैठकीत गणेशमूर्ती सार्वजनिक उत्सवासाठी ४ फूट तर घरगुती स्वरूपासाठी २ फुटांची असावी, गणेश स्थापना व गणेश विसर्जन या दिवशी कोणत्याही प्रकारच्या मिरवणुकीवर व वाद्यवृंदावर बंदी घालण्यात आलेली आहे. सार्वजनिक उत्सवासाठी आवश्यक परवानगी घेऊन अधिकृत वीज जोडणी घ्यावी व कोणताही अनुचित प्रकार घडणार नाही याची जागरूकपणे काळजी घेण्याचे आवाहन अमोल गायकवाड यांनी केले. गणपती मंडळांनी नियमाधीन राहून जबरदस्तीने वर्गणी वसूल करू नये त्यासाठी सक्ती करू नये, मूर्तीच्या संरक्षणाची जबाबदारी घ्यावी तसेच सोशल मीडियावर तेढ निर्माण होतील अशा पोस्ट व मेसेजेस टाळावेत. याबाबत खबरदारी घेऊन पोलीस प्रशासनास सहकार्य करण्याचे आवाहन साहाय्यक पोलीस निरीक्षक स्वप्निल राजपूत यांनी केले. प्रवीण दोशी यांनीही याप्रसंगी मनोगत व्यक्त केले. पोलीस प्रशासन, आरोग्य विभाग, महसूल व ग्रामपालिका यांच्या समन्वयामुळे कोरोनाचा सामना वणीकरांनी केला. तिसऱ्या लाटेचा संभाव्य धोका लक्षात घेत आरोग्याची व जीविताची काळजी घेऊन नियमानुसार गणेशोत्सव साजरा करण्याचे आवाहन करण्यात आले. रविकुमार सोनवणे, विलासराव कड यांनी याप्रसंगी मनोगत व्यक्त करून मार्गदर्शक सूचना केल्या. उद्योजक महेंद्र पारख, किरण गांगुर्डे, गोविंद थोरात, अमोल भालेराव, मंगेश झोटिंग, ग्रामविकास अधिकारी जी.आर. आढाव, संदीप तिवारी, कैलास चोपडा, प्रदीप शिंदे व पोलीस कर्मचारी तसेच विविध मान्यवर उपस्थित होते.
गणेशोत्सवात मिरवणूक, वाद्य वाजविण्यास बंदी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 03, 2021 12:11 AM
वणी : आगामी गणेशोत्सव साजरा करताना पोलीस प्रशासन परवानगी, कोविड नियमांचे पालन, सार्वजनिक धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांवर बंधने, वाद्ये व मिरवणुकीस बंदी या सर्वांचे पालन करून गणेशोत्सव साजरा करण्याचे आवाहन उपविभागीय अधिकारी अमोल गायकवाड यांनी केले.
ठळक मुद्देवणी : उपविभागीय पोलीस अधिकारी गायकवाड यांचे मंडळांना आवाहन