नाशिक : अयोध्येतील श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र येथून अभिमंत्रित करून मिळालेल्या निमंत्रणाच्या अक्षतांच्या कलशांचे पूजन शनिवारी (दि. १६) रामकुंड, पंचवटी येथे विविध साधुसंत, कारसेवक यांच्या उपस्थितीत तीर्थ पुरोहित यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी भारत सेवाश्रम संघाचे स्वामी परिपूर्णानंद, दिगंबर आखाड्याचे श्रीमंत राम किशोरदास शास्त्री, स्वामी नारायण मंदिर अक्षरधाम मठाचे महाव्रत स्वामी, गोपीनाथ गौडीय मठाचे आचार्य, अखिल भारतीय सत्संग प्रमुख दादा वेदक, क्षेत्रीय संघटनमंत्री श्रीरंग जी राजे, पश्चिम महाराष्ट्र प्रांत धर्माचार्य संपर्कप्रमुख माधवदास राठी, शहरातील सनातन धर्म संस्थांचे प्रमुख उपस्थित होते. दरम्यान, शहरातील एकूण ३१ वेगवेगळ्या ज्ञानी संस्थांचे प्रमुख, कविता राऊत, रोहिदास मडके, ॲड. विक्रांत गांगुर्डे, सुनील गवांदे, डॉ. बैरागी, राजाभाऊ गायकवाड, विलास पांजगे, विशाल बागडी, मांडले, सचिन परमार, शैलेश देवी, रवींद्र खत्री, राजेश भोरे, दुधिदास रामजी मारू, युवराज सैंदाणे, बाबा रणजीत सिंह, हिरामण नांदगावकर, डॉ. भास्कर म्हरसाळे, अमोल पगारे, दिलीप कोठावदे, अभय ताठे, छोटू जैन, आबा पाटकर, नितीन कानडे, राज पानसरे, कैलास वराडे यांच्या हस्ते कलशांचे पूजन करण्यात आले. या पूजेचे पौरोहित्य पुरोहित संघ व सनातन संस्था यांच्यामार्फत करण्यात आले. रामाच्या वेषेत बालकेशोभायात्रेचा मार्ग रामकुंड, मालेगाव स्टॅण्ड, पंचवटी कारंजा, मालवीय चौक, नाथ लेन, शिवाजी चौक, गजानन चौक, नाग चौक, ढिकलेनगर, काळाराम मंदिर पूर्व दरवाजा येथे समारोप करण्यात आला, त्यानंतर प्रसाद वाटप करण्यात आले. यात कलशधारी महिला, राम मूर्तीची पालखी, नाम संकीर्तन, राम तांडव, लेझीम पथक, ढोल पथक, रामाच्या वेशभूषेतील लहान मुले सहभागी झाले होते, यावेळी महर्षी गौतम गोदावरी पाठशाला, इस्कॉन, गजानन महाराज भक्त परिवार, गोंदवलेकर महाराज भक्तपरिवार, गौडीय मठ, धर्मसभा तसेच संस्थांचे, मंदिरांचे राजकीय पक्षांचे प्रतिनिधी सहभागी झाले होते. रथयात्रा नियोजनमध्ये विश्व हिंदू परिषद जिल्हा मंत्री योगेश बहाळकर, विभाग मंत्री अनिल चांदवडकर व यात्रा समिती म्हणून महेश महंकाळे, अमृत सदावर्ते, चंद्रशेखर जोशी, वृषाली घोलप, सुचिता भानुवंशी यानी कामं पहिले.
निमंत्रणाच्या अक्षता कलशांची शोभायात्रा; प्रभू रामललाच्या वेषेत बालके
By suyog.joshi | Published: December 16, 2023 5:57 PM