शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live : आज मतदार सत्ताधारी, राज्यात ४ हजार १३६ उमेदवारांचे भवितव्य ‘ईव्हीएम’मध्ये बंद होणार!
2
मुंबई, ठाण्यात ठाकरे, शिंदेंची प्रतिष्ठा पणाला! ठाकरे बंधूंच्या मतदारसंघांकडे लक्ष
3
नालासोपाऱ्यात कॅश ड्रामा! पैसे वाटपाच्या आरोपांवरून विनोद तावडेंना घेरले; तीन गुन्हे दाखल
4
जगभर : मुजतबा खामेनेई : ‘शांत’ डोक्याचा ‘सुप्रीम लीडर’!
5
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: सकाळची वेळ नवीन कार्यारंभासाठी अनुकूल!
6
टक्का वाढला पाहिजे..! सर्वोच्च अधिकार नाकारून कसे चालेल...?
7
Maharashtra Assembly elections 2024: कोणत्या मुद्द्यांभोवती फिरली प्रचारचक्रे ? 
8
विशेष लेख: ‘अर्बन नक्षल’- भाजपच्या मानगुटीवरचे भूत 
9
नरेंद्र मोदी, राहुल गांधी, ठाकरे करणार कोथरुडात मतदान; नामसाधर्म्यामुळे प्रशासनाची धावपळ
10
नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीसाठी आज मतदान; काँग्रेस-भाजपमध्ये लढत 
11
झारखंड : दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला; अंतिम टप्प्याचे आज ३८ जागांवर मतदान
12
ज्यांच्या बळावर मतदान, त्यांचाच हिरावला अधिकार; दोन हजार पोलिसांचे बॅलेटच आले नाहीत
13
विशेष लेख: हवामानबदल रोखण्याचा ‘खर्च’ कोण उचलणार, यावर खडाजंगी
14
हल्ले, मारहाणीच्या घटनांनी राजकीय वातावरण तापले; प्रचारादरम्यान काय-काय घडलं?
15
३५ हजार पोलिसांचा फौजफाटा मुंबईत सज्ज; चार हजार जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई
16
वरळीतील १,३३९ मतदारांच्या सोयीसाठी; चक्क उड्डाणपुलाखाली दोन मतदान केंद्रे
17
मतदान शांततेत पार पाडा, जबाबदारी निभावा; पोलिस महासंचालक संजय वर्मा यांचे आवाहन
18
सुप्रिया सुळे, नाना पटोलेंनी बिटकॉइन स्कॅम केला, निवडणुकीत परदेशी चलनाचा वापर; भाजपाचा आरोप
19
डहाणूचा बविआ उमेदवार भाजपात आला, त्याचाच राग ठाकूर पिता-पुत्रांनी काढला? चर्चांना उधाण
20
रोहित पवारांच्या कारखान्यातील अधिकाऱ्याला पैसे वाटताना पकडले; पोलिसात गुन्हा दाखल

‘ईद-ए-मिलाद’निमित्त मिरवणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 22, 2018 12:52 AM

इस्लामचे अंतिम प्रेषित हजरत मुहम्मद पैगंबर यांची जयंती (ईद-ए-मिलाद) शहर व परिसरात अभूतपूर्व उत्साहात साजरी करण्यात आली. जुने नाशिकमधून बुधवारी (दि.२१) ‘जुलूस-ए-मुहम्मदी’ची मुख्य भव्य मिरवणूक काढण्यात आली. मिरवणुकीत मोठ्या संख्येने मुस्लीमबांधव सहभागी झाले होते. मिरवणूक मार्गावरील आकर्षक सजावटीने लक्ष वेधून घेतले.

नाशिक : इस्लामचे अंतिम प्रेषित हजरत मुहम्मद पैगंबर यांची जयंती (ईद-ए-मिलाद) शहर व परिसरात अभूतपूर्व उत्साहात साजरी करण्यात आली. जुने नाशिकमधून बुधवारी (दि.२१) ‘जुलूस-ए-मुहम्मदी’ची मुख्य भव्य मिरवणूक काढण्यात आली. मिरवणुकीत मोठ्या संख्येने मुस्लीमबांधव सहभागी झाले होते. मिरवणूक मार्गावरील आकर्षक सजावटीने लक्ष वेधून घेतले.  ईद-ए-मिलाद हा सण मुस्लीम बांधवांकडून मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो. दरवर्षी यानिमित्ताने मशिदींसह घरे, दुकाने व परिसरात सजावट करण्यात येते. मागील आठवडाभरापासून शहरातील मुस्लीम बहुल भागात लगबग पहावयास मिळत होती. दुपारी पावणेचार वाजता शहर-ए-खतीब हिसामुद्दीन अशरफी यांच्या नेतृत्वाखाली मिरवणुकीला चौकमंडई येथील जहांगीर मशिदीपासून उत्साहात प्रारंभ करण्यात आला. यावेळी खासदार हेमंत गोडसे, देवयानी फरांदे, पोलीस आयुक्त डॉ. रवींद्रकुमार सिंगल यांनी खतीब व शहर-ए-काझी सय्यद मोईजोद्दीन, मौलाना हाफीज अब्दुल जब्बार, हाजी सय्यद मीर मुख्तार अशरफी यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. यानंतर खतीब यांनी संपूर्ण मानवजातीच्या कल्याणासाठी तसेच देशाच्या संरक्षण तथा प्रगतीसाठी विशेष दुआ मागितली.‘नारे तकबीर अल्लाहू अकबर’, ‘नारे रिसालत या रसूलअल्लाह’, ‘जश्न-ए- ईद-ए-मिलाद जिंदाबाद’चा जयघोष करीत मिरवणुकीला सुरुवात करण्यात आली. मिरवणूक चौकमंडई येथून पारंपरिक मार्गाने हजरत पीर सय्यद सादिकशाह हुसेनी बाबा यांच्या बडी दर्गाच्या प्रांगणात पोहचली. खतीब यांच्यासह पहिले मंडळ संध्याकाळी साडेसहा वाजेच्या दरम्यान दाखल झाले. मिरवणूक रात्री नऊ वाजेपर्यंत जुने नाशिक भागातून सुरू होती. अखेरचे मंडळ रात्री उशिरा सुमारे साडेनऊच्या सुमारास दर्ग्यात पोहचले. अग्रभागी खतीब यांची जीप होती. तसेच मीर मुख्तार अशरफी ध्वनिक्षेपकावरून पैगंबर यांच्या शिकवणीवर प्रकाश टाकत होते. मदरसा सादिकुल उलूम, गौस-ए-आझमचे विद्यार्थी पठाणी कुर्ता परिधान क रून पारंपरिक पोशाखात सहभागी झाले होते. सहभागी मंडळांच्या कार्यकर्त्यांकडून शिस्तबध्द पध्दतीने संचलन करत दुरूदोसलाम, नात-ए-रसूलचे पठण केले जात होते. मिरवणुकीनिमित्त दुपारी द्वारका, सारडा सर्कल, गंजमाळ सिग्नल, भद्रकाली बाजाराकडून येणारी वाहतूक पोलिसांनी वळविली होती.लक्षवेधी घोडेस्वारमिरवणुक ीत सुमारे दहा मंडळांनंतर पाच घोडेस्वारांनी संचलन केले. मिरवणूक मार्गावर आकर्षक पद्धतीने सजविलेल्या घोड्यांसह लहानग्यांना पारंपरिक पोशाखात तयार करून घोड्यांवर बसवून रपेट मारण्यात आली. हे घोडेस्वार परिसरातील नागरिकांचे आकर्षण ठरले. तसेच आकर्षक पद्धतीने सजविलेल्या रिक्षांसह चारचाकी वाहनेदेखील लक्षवेधी ठरली.धार्मिक देखावेईद-ए-मिलादनिमित्त संपूर्ण जुने नाशिक, वडाळागाव परिसरात आकर्षक सजावट करण्यात आली होती. विविध सामाजिक, धार्मिक मंडळांनी धार्मिक देखावे उभारण्यावर भर दिल्याचे दिसून आले. ठिकठिकाणी चौकाचौकात मक्का-मदिना शरीफच्या आकर्षक प्रतिकृती उभारण्यात आल्या होत्या. तसेच परिसरात हिरवे ध्वज, पताका, विद्युत रोषणाई करून सजावट करण्यात आली होती. चौकमंडई, बागवानपुरा, मुलतानपुरा, कोकणीपुरा, खडकाळी, शहीद अब्दुल हमीद चौकात आकर्षक स्वागतकमानी लावण्यात आल्या होत्या.बुधवारी पहाटेच्या नमाजपठणानंतर मशिदींमध्ये विविध धार्मिक कार्यक्रम पार पडले. शहरातील मशिदी, मदरशांमध्ये सामूहिक कुराणपठण, पैगंबरांवर अधारित काव्यपठण, दरुदोसलामचे पठण करण्यात आले.जुलूस डीजेमुक्तकुठल्याही प्रकारे कायदासुव्यवस्थेचे उल्लंघन होणार नाही, याची खबरदारी प्रत्येकाने घ्यावी, जुलूसमध्ये डीजे घेऊन मंडळांनी सहभागी होऊ नये, असे आवाहन खतीब यांनी केले होते. त्यामुळे गेल्यावर्षीप्रमाणे यावर्षीही पैगंबर जयंतीची मिरवणूक डीजेमुक्त राहिली. त्यांच्या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद समाजबांधवांकडून मिळाला.

टॅग्स :Muslimमुस्लीमReligious programmeधार्मिक कार्यक्रम