पाथरे : तालुक्यातील शहा गावचे ग्रामदैवत श्री कालभैरवनाथ महाराज यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. यानिमित्त गावातून रथ मिरवणूक काढण्यात आली.ग्रामस्थ व कारवाडी येथील श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने शहा येथे कालभैरवनाथ महाराज जयंती सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रम पार पडले. सामुदायिक श्री कालभैरवाष्टक पठण, सेवेकरी मार्गदर्शन, सायंकाळी महाआरती, दिवसभर हवनयुक्त श्री कालभैरवाष्टक पठण आदींसह विविध धार्मिक कार्यक्रम झाले. भैरवनाथ हायस्कूल, एस. डी. जाधव इंग्लिश स्कूल, लिटल फ्लॉवर, प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांनी शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली मंदिरात कालभैरवाष्टकाचे सामुदायिक पठण केले.परिसरातील भाविकांनी भैरवनाथ महाराजांचे दर्शन घेण्यासाठी मोठी गर्दी केली होती. गावातून भैरवनाथ महाराजांच्या मूर्तीची आणि स्वामी समर्थ महाराज प्रतिमा व पादुकांची सवाद्य मिरवणूक काढण्यात आली. मिरवणुकीत भैरवनाथ भजनी मंडळ, ग्रामस्थ, महिला, भैरवनाथ विद्यालयाचे विद्यार्थी, शिक्षकांनी सहभाग घेतला. महाप्रसादाने कार्यक्रमाची सांगता झाली.
शहा येथे कालभैरवनाथ जयंतीनिमित्त मिरवणूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 1, 2018 22:30 IST
पाथरे : तालुक्यातील शहा गावचे ग्रामदैवत श्री कालभैरवनाथ महाराज यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. यानिमित्त गावातून रथ मिरवणूक काढण्यात आली.
शहा येथे कालभैरवनाथ जयंतीनिमित्त मिरवणूक
ठळक मुद्देमहाप्रसादाने कार्यक्रमाची सांगता