नाशिकरोड : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त संभाजी ब्रिगेडच्या वतीने काढण्यात आलेली मिरवणूक उत्साहात पार पडली. महिलांचे लेजीम पथक व लहान मुलांनी दाखविलेले शिवकालीन शस्त्रकला प्रात्यक्षिक मिरवणुकीचे आकर्षण ठरले होते. छत्रपती शिवाजी महाराज पुतळा येथून सायंकाळी संभाजी ब्रिगेडच्या वतीने काढण्यात आलेल्या शिवपालखी मिरवणुकीचे उद्घाटन डॉ. हेमलता पाटील, वत्सला खैरे, रंजना बोराडे, निवृत्ती अरिंगळे, हरिष भडांगे, प्रकाश बोराडे, अजित बने, गणेश कदम, नितीन रोटे पाटील, माधुरी भदाणे आदि मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडले. शिवपालखीच्या बग्गीमध्ये छत्रपतींची वेशभुषा करून एक युवक स्थानापन्न झाला होता. घोड्यावर स्वार झालेले मावळे, महिला लेजीम पथक व शिवकालीन शस्त्रकलेचे प्रात्यक्षिक दाखविणारे लहान मुले-मुली हे मिरवणुकीचे आकर्षण ठरले होते. शिवाजी पुतळा येथून निघालेली मिरवणूक आंबेडकर पुतळा, सुभाषरोड, सत्कार पॉर्इंट, मुक्तिधाम मार्गे बिटको पॉर्इंटपर्यंत काढण्यात आली. मिरवणुकीत संभाजी ब्रिगेडचे जिल्हाप्रमुख योगेश निसाळ, सुभाष वाघ, कृष्णा घाटोळ, राजाभाऊ जाधव, रवींद्र दातीर, भीमराव सातपुते, जयप्रकाश गायकवाड, भाऊसाहेब शिरोळे, रामहरी शिंदे, कपिल बाहुले, राहुल बोराडे, नितीन टिळे, बबन थेटे आदिंसह शिवप्रेमी, महिला सहभागी झाले होते. (प्रतिनिधी)
संभाजी ब्रिगेडच्या वतीने काढण्यात आलेली मिरवणूक
By admin | Published: February 20, 2015 1:47 AM