लोकमत न्युज नेटवर्कनाशिक : कांदा लागवडीत व्यस्त असलेल्या मका उत्पादक शेतक-यांच्या खळ्यात पडून असलेला सुमारे दिड लाख क्विंटल मका डिसेंबर नंतरही खरेदी करण्याचा निर्णय शासनाने घेतल्यामुळे जिल्ह्यातील सुमारे तीन हजार शेतक-यांना मोठा दिलासा मिळाला असून, जिल्हा मार्केटींग फेडरेशनने दहाही खरेदी केंद्रे शेतक-यांचा मका खरेदी संपेपर्यंत कायम सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.जिल्ह्यात यंदा पावसाने कृपा केल्यामुळे मक्याचे उत्पादन अधिक झाले आहे, अशातच व्यापा-यांनी नोव्हेंबरपासूनच मक्याचे भाव खाली पाडल्यामुळे मका उत्पादक शेतक-यांच्या तोंडचे पाणी पळाले होते. ९०० ते ११०० रूपये प्रति क्विंटल या दराने व्यापा-याने मका खरेदी करण्यास सुरूवात केल्याचे पाहून राज्य सरकारने आधारभुत किंमतीत मका खरेदी करण्याचा निर्णय घेतला व त्यासाठी १४२५ रूपये क्विंटल दर जाहीर केला. त्यासाठी शेतक-यांना आॅनलाईन नोंदणी करण्याची सक्ती करण्यात आली. नाशिक जिल्ह्यात मका खरेदीसाठी दहा केंदे्र सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. परंतु मका ठेवण्यास गुदाम उपलब्ध होण्यास उशीर झाल्याने जिल्ह्यात नोंदणी केलेल्या शेतक-यांचा संपुर्ण मका खरेदी होण्याबाबत साशंकता निर्माण झाली होती. त्यातच शासनाने खरेदी केंद्रे फक्त ३१ डिसेंबर पर्यंत सुरू ठेवण्याचे आदेश दिल्यामुळे तर मका उत्पादक शेतक-यांचे तोंडचे पाणी पळाले होते.नाशिक जिल्ह्यात डिसेंबर अखेर ३३१५७ क्विंटल मका खरेदी करण्यात आला असून, अजुन २९५३ शेतक-यांकडे १४१३५० क्विंटल मका खरेदी विना पडून आहे. शासनाच्या मुदतीत फक्त ८१८ शेतक-यांचाच मक्याची खरेदी झाली होती. शासनाने दिलेल्या मुदतीनंतर म्हणजेच १ जानेवारी नंतर पडून राहणा-या मक्याचा मोठा प्रश्न उपस्थित झाला होता. अखेर राज्यातच सर्वत्र हीच परिस्थिती राहिल्याने राज्य सरकारने मार्केटींग फेडरेशनला ज्या शेतक-यांनी मक्याची नोंदणी ३१ डिसेंबरपुर्वी केली असेल अशा सर्वांचा मका खरेदी करे पर्यंत खरेदी केंद्रे सुरूच ठेवण्याचे आदेश दिले. त्यामुळे जिल्ह्यातील दहाही खरेदी केंद्रे सुरू ठेवण्यात आली आहेत.
नाशिक जिल्ह्यात दिड लाख क्विंटल मक्याची होणार खरेदी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 02, 2018 1:32 PM
लोकमत न्युज नेटवर्कनाशिक : कांदा लागवडीत व्यस्त असलेल्या मका उत्पादक शेतक-यांच्या खळ्यात पडून असलेला सुमारे दिड लाख क्विंटल मका डिसेंबर नंतरही खरेदी करण्याचा निर्णय शासनाने घेतल्यामुळे जिल्ह्यातील सुमारे तीन हजार शेतक-यांना मोठा दिलासा मिळाला असून, जिल्हा मार्केटींग फेडरेशनने दहाही खरेदी केंद्रे शेतक-यांचा मका खरेदी संपेपर्यंत कायम सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला ...
ठळक मुद्देशेतक-यांना दिलासा : दहाही केंद्रे कार्यान्वित२९५३ शेतक-यांकडे १४१३५० क्विंटल मका खरेदी विना पडून