साहित्यकणा फाउंडेशन यांच्यातर्फे आयोजित एकदिवसीय राज्यस्तरीय साहित्यकणा संमेलनाच्या अध्यक्षीय भाषणात व्यक्त केले. समर्थ मंगल कार्यालय येथे झालेल्या संमेलनात उपस्थित साहित्यिकांशी संवाद साधताना डॉ. पाटील यांनी साहित्य, कविता यांच्याशी निगडित व्यक्ती आणि साहित्यिकांनी चौकटीतून बाहेर पडणे आवश्यक असल्याचे सांगितले. जे दर्जेदार आहे तेच काळाच्या ओघात टिकणार आहे. त्यामुळे वेगवेगळ्या क्षेत्रातील लोकांनी साहित्य क्षेत्रात त्यांचे अनुभव कथन करायला हवे असे आवाहन डॉ. पाटील यांनी केले. दिवसभर चाललेल्या या संमेलनात कविसंमेलनांतर्गत घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय काव्य स्पर्धेत प्रमोद घोरपडे, शुभांगी पाटील, काशिनाथ गवळी यांनी अनुक्रमे प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांक मिळवला, ‘डिजिटल जगातील पुस्तकांचे महत्त्व’ या विषयावरील चर्चासत्रात प्रा. डॉ. वेदश्री थिगळे, विवेक उगलमुगले, किरण सोनार यांनी त्यांची मते मांडली. या चर्चासत्राचे समन्वयन आणि सूत्रसंचालन संदीप देशपांडे यांनी केले. यावेळी जयप्रकाश जातेगावकर, संजय करंजकर यांच्यासह साहित्यकणा फाउंडेशनचे अध्यक्ष संजय गोराडे, सचिव विलास पंचभाई, वसंत खैरनार, विश्वास देवकर, प्रा. डॉ यशवंत पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.
इन्फो
वाड्मय पुरस्कार प्रदान
संमेलनाच्या अखेरीस साहित्यकणा वाड्मय पुरस्काराचे वितरण करण्यात आले. त्यात तनुजा ढेरे (ठाणे) यांच्या ‘फुलवा’ या कथासंग्रहास सुमन पंचभाई कथासंग्रह पुरस्कार, बालाजी इंगळे यांच्या ‘या परावलंबी दिवसात’ या कवितासंग्रहाला सदाशिव खांदवे कवितासंग्रह पुरस्कार, प्रा. श्रीकांत पाटील (घुणकी, कोल्हापूर) यांच्या ‘लॉकडाउन’ या कादंबरीस शीला गहिलोत - राजपूत कादंबरी पुरस्कार तर रजनी वाणी यांना साहित्य साधना पुरस्कार मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.