नाशिक : विविध मागण्यांसाठी वारंवार आंदोलने करू नही प्रश्न सुटत नसल्याने राज्यातील प्राध्यापकांनी दि. २५ सप्टेंबर पासून पुकारलेला संप अजूनही सुरूच आहे. नाशिक जिल्ह्यातील सुमारे दोन हजार प्राध्यापकांपैकी सुमारे पंधराशेहून अधिक प्राध्यापक पहिल्या दिवशी या संपात सहभागी झाले होते. परंतु, काही प्राध्यापकांनी स्थानिक संघटनांचा निर्णय घेऊन नियमित कामकाज सुरू केले असून, संपाच्या १२व्या दिवशी ३७५ शिक्षक संपात प्रत्यक्षरीत्या पूर्णवेळ सहभागी आहेत. संपात सहभागी असताना परीक्षचे कामकाज करणाºया शिक्षकांची संख्या साडेचारशे ते पाचशेपर्यंत असून, सध्या आठशेहून अधिक शिक्षक संपात सहभागी असले तरी संपाचा फारसा प्रभाव महाविद्यालयांमध्ये दिसून येत नसल्याचे काही प्राध्यापकांनी सांगितले आहे.महाराष्ट्र प्राध्यापक संघटनेने दोन महिन्यांत तब्बल पाचवेळा राज्यस्तरीय आंदोलने करूनही प्राध्यापकांची एकही मागणी पूर्ण होऊ शकलेली नाही. त्यामुळे प्राध्यापकांनी कामबंद आंदोलनाचा निर्णय घेतल्या असून, या संपाला १२ दिवस उलटले आहे. यापूर्वी प्राध्यापकांनी ६ आॅगस्टला काळ्या फिती लावून शिक्षक मागणी दिन पाळला होता. त्यानंतर २० आॅगस्टला उच्च शिक्षण सहसंचालक यांच्या विभागीय कार्यालयासमोर प्राध्यापक प्रतिनिधींनी उपस्थित राहून निदर्शने केली होती. परंतु त्यानंतरही प्राध्यापकांच्या मागण्यांची पूर्तता होऊ शकलेली नसल्याने प्राध्यापक महासंघाने कामबंद आंदोलन के ले आहे. या संपात विनाअनुदानित महाविद्यावलयांचे प्राध्यापक सहभागी नाहीत. त्याचप्रमाणे काही प्राध्यापकांनी सुरुवातीच्या तीन-चार दिवसांनंतर कामकाज सुरू केल्याने प्रथम सत्राचा अभ्यासक्रम पूर्ण झाला आहे. सध्या परीक्षांचा कालावधी सुरू असल्याने उर्वरित प्राध्यापकही परीक्षांना सहकार्य करीत आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांचे कोणत्याही प्रकारे नुकसान होत नसल्याचे महाविद्यालयांकडून सांगण्यात आले आहे. काही प्राध्यापकांकडून कामकाज सुरू नाशिकमधील एचपीटी, आरवायके, बिटको, भोसला महाविद्यालयांसह नामपूर येथील महाविद्यालयाच्या प्राध्यापाकांनी संपात सुरुवातीपासूनच सहभाग घेतलेला नाही, तर केटीएचएम, व्ही. एन. नाईक, पंचवटी व देवलाळी कॅम्पच्या व सिडको या शहरातील महाविद्यालयासह ग्रामीण भागातील इगतपुरी, सिन्नर, निफाड, त्र्यंबकेश्वर, क ळवण, देवळा, सटाणा, मनमाड, नांदगाव, मालेगाव, ताराबाद, दिंडोरी, वणी, सुरगाणा, पिंपळगाव आदी महाविद्यालयांपैकी काही महाविद्यालयांमध्ये प्राध्यापकांनी सुरुवातीच्या तीन-चार दिवसांनंतर नियमित कामकाज सुरू केले आहे.
नाशिकमध्ये बाराव्या दिवशीही प्राध्यापकांच्या संप सुरूच ; परीक्षांना मात्र सहकार्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 06, 2018 4:20 PM
विविध मागण्यांसाठी वारंवार आंदोलने करू नही प्रश्न सुटत नसल्याने राज्यातील प्राध्यापकांनी दि. २५ सप्टेंबर पासून पुकारलेला संप अजूनही सुरूच आहे. नाशिक जिल्ह्यातील सुमारे दोन हजार प्राध्यापकांपैकी सुमारे पंधराशेहून अधिक प्राध्यापक पहिल्या दिवशी या संपात सहभागी झाले होते. परंतु, काही प्राध्यापकांनी स्थानिक संघटनांचा निर्णय घेऊन नियमित कामकाज सुरू केले असून, संपाच्या १२व्या दिवशी ३७५ शिक्षक संपात प्रत्यक्षरीत्या पूर्णवेळ सहभागी आहेत.
ठळक मुद्देप्राध्यपकांच्या संपाचा बारावा दिवसपरीक्षांना सहकार्य, 375 प्राध्यपकांचे पूर्णवेळ कामकाज बंद काही प्राध्यपकांकडून नियमित कामजास सरुवात