येवला : तालुक्यातील नगरसूल येथील खंडेराव महाराज यात्रोत्सवास सोमवारपासून (दि.२२) प्रारंभ होत असून, यात्रा कमिटीच्या वतीने जय्यत तयारी करण्यात आली आहे. दरवर्षी खंडेराव देवस्थानमार्फत यात्रा पार पडते. यात्रेनिमित्त सोमवारी (दि. २२) बारागाड्या ओढण्याचा व कावड मिरवणूक कार्यक्र म होणार आहे.नगरसूल येथे सालाबादाप्रमाणे यावर्षी सोमवारी दि. २२ ते २३ दरम्यान खंडेराव महाराज यात्रोत्सव पार पडणार आहे. यानिमित्त सुमारे ३०० भाविकांनी कोपरगाव येथून गोदावरी नदीतून तीर्थ आणलेल्या कावडची मिरवणूक सकाळी ८ वाजता काढण्यात येणार आहे. त्यानंतर श्रीमंत खंडेराव महाराज यांच्या मूर्तीवर अभिषेक होईल. दुपारी ४ वाजता बारागाड्या ओढणाऱ्या चांगदेव पैठणकर, रामदास पैठणकर, विलास पैठणकर, ज्ञानेश्वर पैठणकर या नवरदेवांची गावातून मिरवणूक काढण्यात येणार आहे. (वार्ताहर)
नगरसूल येथे यात्रेनिमित्त बारागाड्या ओढण्याचा कार्यक्र म
By admin | Published: February 20, 2016 10:52 PM